घरताज्या घडामोडीTelugu Actress Gayatri Passes Away: तेलुगू अभिनेत्री गायत्रीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Telugu Actress Gayatri Passes Away: तेलुगू अभिनेत्री गायत्रीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू

Subscribe

अभिनेत्री गायत्रीला डी क्रूज नावाने ओळखले जात होते. तिने मॅडम सर मॅडम या प्रसिद्ध तेलुगू वेब सीरीजमध्ये काम केले होते.

मागील काही वर्षांपासून सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा मृत्यू होत आहे. आज तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूजचे कार अपघातात निधन झाले. ती २६ वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री होळीनिमित्त मित्र मैत्रिणींसोबत कारमधून फिरायला गेली होती. घरी परत येत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. हैद्राबादच्या गाचीबोवली येथे त्यांची कार डिव्हाइडरला ठोकली. ज्यात गायत्रीचा जागीच मृत्यू झाला.

अभिनेत्री गायत्रीला डी क्रूज नावाने ओळखले जात होते. तिने मॅडम सर मॅडम या प्रसिद्ध तेलुगू वेब सीरीजमध्ये काम केले होते. या सीरिजमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती त्याचप्रमाणे तिचे यूट्यूब चॅलनही होते. अभिनयात करिअर करण्याची स्वप्ने घेऊन आलेल्या गायत्रीचा अचानक मृत्यू झाल्याने तेलुगू सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Surekhavani (@artist_surekhavani)

- Advertisement -

गायत्रीची मैत्रीण आणि अभिनेत्री सुरेखा वाणीने गायत्रीच्या निधनाची माहिती दिली. सुरेखाने गायत्रीसोबतचा फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली. तु तुझ्या या आईला सोडून कशी जाऊ शकतेस. तु या जगात नाही यावर मला विश्वास बसत नाहीये. तु मला सोडून जाण्याची ही वेळ नाही. मला नेहमी तुझी आठवण येईल, असे सुरेखाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेय. सुरेखा आणि गायत्रीसोबत ऑन स्क्रिन आईची भूमिका साकारली होती. गायत्रीच्या जाण्याने सुरेखा फार दु:खी झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  ऐश्वर्या रजनीकांत लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -