घरमहाराष्ट्रमुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांना कोर्टाचा दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांना कोर्टाचा दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

Subscribe

मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. सत्र न्यायालयाने सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर प्रवीण दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. दरेकर यांच्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सत्र न्यायालयाने सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले. यावेळी सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे.

- Advertisement -

प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबै बँकेतील मजूर घोटाळा प्रकरणी फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये मुंबई बँकेची शाखा आहे. प्रवीण दरेकर हे मजूर नसताना मजूर म्हणून भासवले आणि निवडणूक लढवली याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

षडयंत्र करुन गुन्हा दाखल केला – दरेकर

प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, विविध मार्गाने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला पंरतु कोणत्याही मार्गाने गुन्हा दाखल करता आला नाही. म्हणून जिथे राजीनामा दिला आहे. त्याच ठिकाणी पुन्हा जोरजबरदस्तीने गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर काही हरकत नाही. मला काही कल्पना नाही आहे. अधिकाऱ्यांवर जोर जबरदस्ती करुन गुन्हा दाखल केला असल्याचे दिसत आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला असेल तर दाद मागू असे दरेकर म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -