घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र : शरद पवारांचे ठाकरे गटाला मदत करण्याचे संकेत

मविप्र : शरद पवारांचे ठाकरे गटाला मदत करण्याचे संकेत

Subscribe

नाशिक : मविप्रचे शिल्पकार अ‍ॅड. बाबूराव ठाकरे या विशेष पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या पुस्तकात बाबूराव ठाकरे यांचे मविप्रसाठीचे योगदान व त्यांनी केलेले कार्य तसेच सोबतच्या आठवणी याचा मागोवा ३० लेखकांनी शब्दातून मांडला आहे. प्रकाशनानंतर शरद पवार यांनी कर्मवीर बाबूराव ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत पुस्तकाचे कौतुक केले. पुस्तकाचे संपादन बाळासाहेब गुंजाळ यांनी केले आहे.
हॉटेल एमरल्ड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात माजीमंत्री छगन भुजबळ, मविप्रचे माजी सभापती नितीन ठाकरे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, आमदार माणिकराव कोकाटे, डॉ. सयाजीराव गायकवाड, बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. अशोक पिंगळे, विक्रांत मते, आमदार दिलीप बनकर, अंबादास बनकर, लक्ष्मीकांत कोकाटे, राजेंद्र डोखळे, मनीष लोणारी, सुरेखा बोराडे, मदन पवार, बाबुराव तांबे, रमेश पिंगळे व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

मदतीचे आश्वासन दिल्याची चर्चा

पवारांच्या भेटीत माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या गटाला मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. यावेळी आमदार व लोकप्रतिनिधींनी यावेळी सत्ताधारी गटाने कशापद्धतीने यापूर्वी त्रास दिला याविषयी त्यांना माहिती दिली. मविप्र संस्थेच्या आडून सार्वजनिक निवडणुकांमध्ये अडवणुकीचे धोरण राबवले जात असल्याच्या तक्रारीही या लोकप्रतिनिधींनी केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -