घरमहाराष्ट्र...म्हणून संजय राऊत पत्रकार परिषदेतून उठून गेले

…म्हणून संजय राऊत पत्रकार परिषदेतून उठून गेले

Subscribe

त्या ऑडिओ क्लिपसंदर्भात पत्रकार परिषदेत संजय राऊतांना विचारले असता ते खुर्चीवरून उठून निघून गेलेत. अजून एक प्रश्न आहे, तुमच्या ऑडिओ क्लिपबद्दल, असे एका पत्रकाराने विचारले, तेव्हा संजय राऊत ताडकन खुर्चीवरून उठले आणि चालायला लागले

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केलेत. महिलेनं संजय राऊत यांच्याविरोधात बलात्कार आणि हत्येची धमकी दिल्याचा आरोप करत मुंबईतल्या वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ती महिला आणि संजय राऊत यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली आहे.

त्या ऑडिओ क्लिपसंदर्भात पत्रकार परिषदेत संजय राऊतांना विचारले असता ते खुर्चीवरून उठून निघून गेलेत. अजून एक प्रश्न आहे, तुमच्या ऑडिओ क्लिपबद्दल, असे एका पत्रकाराने विचारले, तेव्हा संजय राऊत ताडकन खुर्चीवरून उठले आणि चालायला लागले. त्यामुळे संजय राऊतांसंदर्भात व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपवर अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. संजय राऊतांनी आज बोलायला टाळाटाळ केल्यामुळे अनेक अंदाज बांधले जात आहेत.

- Advertisement -

त्या महिलेनं मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला निवेदन दिले होते, हे धमकी प्रकरण देखील या प्रकरणाशी संबंधित आहे. महिलेने ती ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिली, ज्यामध्ये एक पुरुष महिलेशी अश्लील भाषेत संभाषण करीत आहे. 17 सेकंदाच्या ऑडिओ क्लिपमध्ये 27 वेळा संबंधित महिलेला शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.

ऑडिओमध्ये पुरुषाचा असलेला आवाज संजय राऊतांचा आहे, तर महिलेचा आवाज तिचा आहे, असा दावा पीडित महिलेनं केला आहे. तिला कॉलवर धमकावण्यात आले आहे. यामध्ये एका माणसाचा आवाज ऐकू येत आहे, त्यात तो शिवीगाळ करत म्हणतो, ‘आता फोन ठेव… तू मला शिकवतेस काय. तू मला काय समजतेस? माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करू नकोस, मी तुला आधीच सांगतोय, हे रेकॉर्ड करून ठेव. हे रेकॉर्ड केल्यानंतर पोलिसांकडे जा, असंही त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून धमक्या

तक्रारदार महिलेने सांगितले की, ‘मी मुंबई पोलीस आणि ईडीकडे तक्रार केली आहे. मला फोन आणि पेपर्सच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या आहेत. महिलेने दावा केला आहे की, ऑडिओमध्ये माझे आणि संजय राऊतांचे संभाषण आहे. ऑडिओमध्ये अनेक अपशब्द वापरण्यात आले आहेत. अशी भाषा का वापरली जाते हे मला समजत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मला अशा धमक्या येत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही.


हेही वाचाः मराठी माणसाच्या कष्टामुळे मुंबई उभी, याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -