घरताज्या घडामोडीधर्मवीर दिघेसाहेबांची घटना सांगितली तर भूकंप होईल, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

धर्मवीर दिघेसाहेबांची घटना सांगितली तर भूकंप होईल, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Subscribe

धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यानंतर त्यावर भाष्य करणारच आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज ते मालेगावात बोलत होते. तसेच, सध्या मुलाखत सत्र सुरू आहे. मी मुलाखत दिली तर भूकंप होईल, असा इशाराही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. ते मालेगावमध्ये क्रिडा संकुलात बोलत होते.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवलं. त्यामुळे मी आज काही बोलणार नाही. मात्र, समोरून जसजसे तोंड उघडेल तसं मलाही बोलावं लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात..?, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान

मी वयाच्या १६ व्या वर्षापासून शिवसेनेत कार्यकर्ता आहे. कुटुंबाला वेळ दिला नाही. रांत्र-दिवस शिवसेनेसाठी कार्य केलं. आम्हा सर्वांच्या महेनतीने शिवसेना मोठी झाली. आणि यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मग विश्वासघात आणि गद्दारी कोणी केली, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

आम्ही चुकलो असतो तर लोकांनी तोंड फिरवले असते. मालेगावला निघण्यासाठी ठाण्याहून निघालो तेव्हा रात्री १२-१ वाजपेर्यंत लोक रस्त्यावर उभे होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे न्यायची आहे. पण आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी आमचं कौतुक केलं. बहोत लढे, आप लढाऊ है, अशा शब्दांत मोदींनी आमची पाठ थोपटली. मोदी म्हणाले की १ तास १५ मिनिटे १३ सेकंदाचं भाषण मी ऐकलं. मी या भाषणात मनापासून बोललो असं मोदी म्हणाले, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य शासनाच्या सर्व विभागांनी आपापल्या जिल्ह्यात सांघिकपणे कार्य करीत विकास कामांना गती द्यावी. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


मालेगाव येथील तालुका क्रीडा संकुलात आज सकाळी नाशिक विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सर्वश्री दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, बबनराव पाचपुते, दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, सुहास कांदे, फारुक शाह, आमदार श्रीमती मंजुळाताई गावित, लताताई सोनवणे, नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (नाशिक), नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (नाशिक), यांच्यासह विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -