घरमहाराष्ट्रनागपूरNagpur Airport : विमानाचे टेक ऑफ होण्यापूर्वीच पायलटचा मृत्यू, कारण अस्पष्ट

Nagpur Airport : विमानाचे टेक ऑफ होण्यापूर्वीच पायलटचा मृत्यू, कारण अस्पष्ट

Subscribe

नागपूर : विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना नागपूर विमानतळावर घडली असून पायलट नागपूरहून पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्याच्या तयारीत असताना, विमान बोर्ड होण्यापूर्वीच बोर्डिंग गेटजवळ पायलट कोसळला.

ही घटना आज सायंकाळाच्या सुमारास घडली. यात मृत्यू पावलेल्या पायलटचे नाव मनोज सुब्रम्हण्या असे आहे. मनोज हे इंडिगो कंपनीचे विमान नागपूरहून पुण्यासाठी उड्डाण करणार होते. यासाठी पायलट मनोज हे बोर्डिंग गेटजवळ गेले असताना अचानक कोसळले. यानंतर विमानतळाच्या ग्राउंड स्टाफच्या मदतीने पायलट मनोज यांना रुग्णालयात नेहण्यात आले. पण, डॉक्टरांनी पायलटला मृत घोषित केले. यानंतर पायलटला कार्डियक अरेस्ट आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पायलटच्या मृत्यूचे कारण हे शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट असे होईल.

- Advertisement -

हेही वाचा – “आम्ही फोटो वापरणारच..” शरद पवारांच्या इशाऱ्याला अजित पवार गटाचे प्रत्युत्तर

पायलटच्या निधनावर इंडिगो म्हणाले…

- Advertisement -

आमच्या एका पायलटचे नागपूरमध्ये निधन झाले आहे. या पायलटची विमानतळावर अचानक तब्येत बिघडली. यानंतर पायलटला उपचारासाठी रुग्णालयात नेहण्यात आले. पण रुग्णालयात नेहण्यापूर्वीच पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती कंपनीने दिली. पायलटने बुधवारी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालविले होते. यानंतर पायलटने 27 तास विश्रांती घेतली. यानंतर आज 4 सेक्टरसाठी पायलटने दुपारी 1 वाजता प्रस्थान केले होते. पायलटचे विश्रांतीनंतरचे पहिले सेक्टर होते, अशी माहिती इंडिगोने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -