घरमहाराष्ट्रनिवडणुकीच्या तोंडावर भाजप हिंदू-मुस्लीम वाद उफाळून काढतोय; पटोलेंचे गंभीर आरोप

निवडणुकीच्या तोंडावर भाजप हिंदू-मुस्लीम वाद उफाळून काढतोय; पटोलेंचे गंभीर आरोप

Subscribe

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याविरोधात उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी काही लोक सरकर पाडण्याची दिवसा स्वप्न पाहू लागलीत अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

“देशात रोजगार निर्मिती झाली पाहिजे. दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या आश्वासन दिले होते मात्र जेव्हा निवडणुका तोंडावर येतात तेव्हा हिंदू मुस्लिम वाद उफाळून लोकांना तोडण्याचे काम भाजपाकडून वारंवार केले जातेय,” अशा गंभीर आरोप आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

ते म्हणाले की, “भाजपच्या धर्मवादाला देशाची जनता पाठींबा देणार नाही. गांधी कुटुंबियांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांना जनता माफ करणार नाही. पंतप्रधान लोकसभेत कशाप्रकारे भाषण करत होते? पांटेलमध्ये उभे होते का? अशाप्रकारचे व्यवहार आणि मानसिकता भारताची जनता केव्हाच माफ करणार नाही,”

- Advertisement -

“RSS मधील लोकं आज देशाच्या सत्तेवर”

नाना पटोले म्हणाले की, “आरआरएसमधून निर्माण झालेली लोकं आज राज्याच्या आणि देशाच्या सत्तेत बसली आहे. आरआरएस हे सुसंस्कृत आणि संस्कार देणारी संघटना आहे अशापद्धतीने सांगितलं जात होतं. मात्र माझा सवाल आहे की, राहुल गांधींबद्दल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान आरआरएसची संस्कृती आहे का? हे संस्कार आहेत. देशाच्या संस्कार आणि संस्कृतीमध्ये हा विषय येत नाही. एखाद्या आई आणि मुलावर गंभीर टीका करण्याचे पाप आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे,”अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“देशाच्या आईवर आक्षेप घेण्याचे पाप ज्यापद्धतीने केले त्याला कोणीही माफ करणार नाही. खरं तर त्यांची जीभ तुटून पडायला पाहिजे होती, या देशाची व्यवस्था देशाचे पंतप्रधान देखील परवा त्यात लेव्हववर जाऊन बोलतात. काय सुरु आहे या देशामध्ये? अशाप्रकारचे देशाची संस्कृती आणि संस्कार संपवायला लागले आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो. निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वाद पेटवणं हा भाजपचा धंदा राहिलेला आहे. या हिंदू-मुस्लीम वादात लोकं पडायला तयार नाहीत. पहिले आम्हाला नोकरी द्या मग हिजाबचं बोला. शेतकऱ्यांना न्याय द्या, गरीबांना दोन वेळचं खायला द्या यापद्धतीची मागणी आता देशभरात सुरु झाली आहे, पाचही राज्यात भाजपा पराभूत होत आहे त्यामुळे अशाप्रकारे हिंदु- मुस्लीम वाद करुन मुख्य मुद्द्याला बाजूला करण्याचे काम भाजपा सर्व देशात करत आहे,” असही पटोले म्हणाले आहेत.

- Advertisement -

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याविरोधात उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी काही लोक सरकर पाडण्याची दिवसा स्वप्न पाहू लागलीत अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.


Ukraine Tension : अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीची रशियाच्या सागरी हद्दीत घुसली, जग तिसऱ्या महायुद्धाकडे?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -