अण्णा हजारेंचं उपोषण स्थगित, ग्रामपंचायतीचा ठराव केला मान्य

anna hazare cancel fast against wine selling in supermarket

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यारं उपसले आहे. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडूनही 14 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र अण्णांनी उपोषण करुन नये अशा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. अण्णांच्या वयाचा विचार करत त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती या ठरावात करण्यात आली आहे. यानंतर अण्णांनी देखील हा ठराव मान्य केल आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात राळेगणसिद्धीत आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अण्णांनी उपोषण करु नये असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. मात्र अण्णांनी वयाचा विचार करुन उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली. अखेर अण्णांनी ग्रामसभेचा हा ठराव मान्य केला आहे.

राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम  होते. याचपार्श्वभूमीवर त्यांनी उद्यापासून उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता हे आंदोलन स्थगित झाले आहे. राळेगणसिद्धीतील एक जाहीर सभेत अण्णा हजारे यांनी सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला, “सरकारच्या या निर्णयामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही. तुमच्या सरकारला निरोप पोहोचवा,” असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात आज दारु कमी आहे का? बिअर बारची शॉप बाजारात पाहतो, परमीट रुमही पाहतो, वाई शॉपची दुकानंही उघडली आहेत त्याठिकाणी वाईन मिळते ना? मग सरकारने परत दुकानात वाईन विक्रीसाठी का ठेवली? एवढी दुकानं असताना किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी का ठेवली? म्हणजे सर्व लोकांना व्यसनाधीन बनावयचे आहे का? लोकं व्यसनाधीन झाले की, आपल्याला काय साधायचे आहे ते साधता येतात,” असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.