घरताज्या घडामोडीधुळ्यानंतर आता नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ; २५ तलवारी जप्त, तर एकाला...

धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ; २५ तलवारी जप्त, तर एकाला अटक

Subscribe

धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २५ तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी छापा मारत एका रिक्षेमधून २५ तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.

धुळ्यात पोलिसांनी कारवाई करत गुरुवारी ९० तलवारी जप्त केल्या आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज नांदेडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली. शहरातील गोकुळनगर भागातून रिक्षेतून शस्त्रसाठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईत करत रिक्षेची तपासणी केली.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश गोटकवाडला ताब्यात घेतले आहे. विक्रीच्या उद्देशाने तलवारी आणल्याची कबुली त्याने दिली आहे. पंजाबच्या अमृतसर येथून रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचेही आरोपीने सांगितले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या चितोडगड येथून महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीतून शस्त्रास्त्रे नेले जात होते. ही गाडी आर्गा महामार्गाने जात असताना गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांना काही संशयास्पद हालचाली वाटल्या. पोलिसांनी त्या गाडीची झडती घेतली असता गाडीत शस्त्रास्त्रे सापडले.

- Advertisement -

हेही वाचा : Indian Railways: भारतीय रेल्वेकडून अनेक पॅसेंजर ट्रेन रद्द, कोळसा वाहतुकीला रेल्वे मंत्रालयाचे प्राधान्य


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -