घरताज्या घडामोडीVenus-Jupiter conjunction 2022 : दुर्मिळ योग! १ मे रोजी गुरू, शुक्र ग्रहातील...

Venus-Jupiter conjunction 2022 : दुर्मिळ योग! १ मे रोजी गुरू, शुक्र ग्रहातील अंतर कमी होणार

Subscribe

एकाच दशकात अतिशय कमी वेळा अशा पद्धतीने गुरू आणि शुक्र हे ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येतात. दोन्ही ग्रहांमधील अंतर अतिशय कमी होण्याची अशीच एक दुर्मिळ घटना येत्या १ मे रोजीच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. याआधी २००० साली अशीच एक संधी अनुभवायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या नजीक आल्याचे अनुभवायला मिळणार आहे.

१ मे २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार १ः३५ वाजता गुरू आणि शुक्र यांच्यातील अंतर इतक कमी होणार आहे की, त्यांच्या आणि आपल्या मधे चंद्र असता तर चंद्राने दोघांना आपल्या मागे लपवले असते.  त्यावेळी अर्थात हे दोन्ही ग्रह क्षितीजा खाली असतील.

- Advertisement -

सध्या या दोन्ही ग्रहांचा उदय सूर्योदया सुमारे २ तास आधी होत आहे.  तर सूर्योदया पूर्वी सुमारे तास भर आधी पूर्व क्षितिजावर हे दोन्ही ग्रह बरेच वर दिसतील. शुक्र गुरूच्या सुमारे ६.५ पट जास्त प्रखर दिसेल.

खगोलीय दुर्बिणीतून बघताना गेलिलियो ने शोध लावलेले चार उपग्रह पण दिसतील. त्यांची नावे आहेत – आयो ( I ), युरोपा ( II ), गेनीमीड ( III ) आणि केलिस्टो ( IV ) ही तशी दुर्मिळ घटना नव्हे. एक शतकात हे दोन्ही ग्रह सुमारे ४० वेळा इतके जवळ येतात की एकाच वेळी दोन्ही ग्रह चंद्राच्या मागे लपल्या जाउ शकतात. १७ मे २००० रोजी हे ग्रह इतके जवळ आले होते की त्यांना नुसत्या डोळ्यांंनी वेगवेगळ ओळखण शक्य नव्हतं.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -