घरमहाराष्ट्रNashik Drug Case : ड्रग्जच्या पैशातून दादा भुसेंना आर्थिक मदत; संजय राऊतांचा गंभीर...

Nashik Drug Case : ड्रग्जच्या पैशातून दादा भुसेंना आर्थिक मदत; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

मुंबई : नाशिकरोड हद्दीतील शिंदेगावात एमडी ड्रग्जसचे दोन कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याने नाशिकचे नाव देशाच्या नकाशावर आले आहे. याप्रकरणात ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि बलकवडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. परंतु ललित पाटील हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिकमधील पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. (Nashik Drug Case Financial help to Dada Bhuse from drug money Serious accusation of Sanjay Raut)

हेही वाचा – Thackeray vs Shinde : अंगार कोण, भंगार कोण हे येणारा काळ ठरवेल; राऊतांचा शिंदे गटाला टोला

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, ललित पाटील याला ड्रग्जमाफिया म्हणून अटक झाली. परंतु त्याला पळून जायला सरकारमधील मंत्र्याने मदत केली. आम्ही त्या मंत्र्याचे नाव जाहीर केले आहे. त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आजही तो ड्रग्ज माफिया फरार आहे. नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही. ड्रग्जच्या पैशातून फार मोठी आर्थिक मदत दादा भुसेंना मिळत होती, असा आरोप करताना संजय राऊत यांनी यांनी केला आहे.

या सर्व प्रकाराची चौकशी एकनाथ शिंदे विशेषत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित करत महाराष्ट्रात ड्रग्जमाफियांना संरक्षण राज्याचा मंत्री देतो आहे. दादा भुसे यांची दादागिरी तुम्ही मोडून काढणार आहात की, केवळ राजकीय विरोधांसाठी ईडी, सीबीआय आणि पोलीस कारवाया करणार? दादा भुसे यांचा ललित पाटील प्रकरणातील संबंध काय? दादा भुसे आणि शिंदे गटाला किती कोटी मिळाले? त्याबदल्यात काय संरक्षण मिळाले? हा महाराष्ट्राचा सवाल आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून…; व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला

महाराष्ट्राचा उडता पंजाब करणार आहात का?

नाशिक ड्रग्ज प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी करावी. मी याबाबत पत्र लिहणार आहे. राज्यातील पोलीस सरकारची हमाली करणार आहे का? एक मंत्री ड्रग्जमाफियाला मदत करतो आहे, त्याला पळून जाण्यास मदत करतो आहे, तुम्ही महाराष्ट्राचा उडता पंजाब करणार आहात का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -