घरमहाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून...; व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला

राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून…; व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला

Subscribe

मुंबई : गुजरात सरकारने व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाचे आज (11 ऑक्टोबर) मुंबईत आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजराला नेण्यासाठी, तसेच आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केले असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (The chief minister of the state becoming helpless and a slave Sanjay Rauts challenge to Shinde on the Vibrant Gujarat programme)

हेही वाचा – Nashik Drug Case : ड्रग्जच्या पैशातून दादा भुसेंना आर्थिक मदत; संजय राऊतांचा गंभीर आरोप

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं जावं लागत आहे. इथे व्हायब्रंट महाराष्ट्राचा आत्मा काढून गुजरातला पाठवला जातो आहे. जो महाराष्ट्र या देशात उद्योगक्षेत्रात सर्वाधिक व्हायब्रंट होता, त्या महाराष्ट्राला संपवून, मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय का? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जात आहेत, हाच का यांचा अंगार? याच्यावर तुम्ही उत्तर द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केील आहे.

गुजरातसाठी मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतो आहे, मग महाराष्ट्रासाठी तुम्ही (एकनाथ शिंदे) गुजरातला जात आहात का? अहमदाबादला, लखनौला किंवा दिल्लीला जात आहात का? महाराष्ट्रासाठी कधी गेला आहात का? असे प्रश्न विचारत संजय राऊत म्हणाले की, तुम्ही गुजरातसाठी जात आहात, कारण तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे. आम्ही आमच्या गळ्यात कोणाचे पट्टे बाधून घेतले नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray vs Shinde : अंगार कोण, भंगार कोण हे येणारा काळ ठरवेल; राऊतांचा शिंदे गटाला टोला

काय आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024

व्हायब्रंट गुजरातचा पहिला कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला. याठिकाणी 1500 हून अधिक उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी हजेरी लावली होती. 120 हून अधिक डिप्लोमॅट्सनी उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाबद्दल जाणून घेतले. यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री पटेल मुंबईत आले आहेत. येथील ताजमहाल पॅलेस येथे हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, विमा अशा विविध सेवा क्षेत्रांना गुजरातमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित केले जाणार आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 च्या माध्यमातून गुजरातला गेटवे टू द फ्यूचर म्हणून गुजरात सरकार सादर करत आहे. या कार्यक्रमाबद्दल विरोधक आता काय भूमिका घेतात, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -