घरक्राइमप्लॉट-फ्लॅट घेताय, आधी हे वाचा; नवी मुंबईत 20 जणांची 3 कोटी रुपयांना...

प्लॉट-फ्लॅट घेताय, आधी हे वाचा; नवी मुंबईत 20 जणांची 3 कोटी रुपयांना फसवणूक

Subscribe

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या ठिकाणी तब्बल 20 जणांची 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांना फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका बिल्डरशी संबंधित तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : सध्या घर खरेदी करण्याच्या नावावर अनेकांची लाखो रुपयांना फसवणूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे घर किंवा एखादी जागा खरेदी करायची असल्यास नागरिकांकडून त्या घराविषयीची किंवा त्या जागेविषयीची संपूर्ण माहिती काढण्यात येते. त्यानंतरही अनेकदा लोकांची पैशाला फसवणूक झाल्याच्या घटना या घडचतच असतात. परंतु, नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर या ठिकाणी तब्बल 20 जणांची 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांना फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका बिल्डरशी संबंधित तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फसवणुकीची घटना काल मंगळवारी (ता. 10 ऑक्टोबर) उघडकीस आली. (Taking the plot-flat, read this first; 20 people cheated for Rs 3 crore in Navi Mumbai)

हेही वाचा – माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या; धक्कादायक कारण आले समोर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील उरण येथील विंदावणे गावात स्वस्त दरात भूखंड देऊ, अशी बतावणी करत काही लोकांकडून पैसे घेण्यात आले. ज्यांच्याकडून या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे. ते सर्व जण 2019 पासून भूखंडासाठी आरोपींकडे पैसे जमा करत होते. त्यामुळे 2019 पासून 20 जणांनी 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे या आरोपींकडे जमा केले होते. परंतु 4 वर्षांचा कालावधी उलटूनही प्लॉटसाठीची जागा ताब्यात मिळत नसल्याने तक्रारदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

यानंतर या प्रकरणात फसवणूक झालेल्यांनी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणी CBD बेलापूर पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी कथित आरोपी काकासाहेब खाडे, विकास दहिफळे आणि गरुड डेव्हलपर्सच्या मोहिनी तांदळे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 406 (गुन्हेगारी विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती देत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा आरोपींनी भूखंडाचा ताबा दिला नाही, तेव्हा तक्रारदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि चौकशी केली असता त्यांनी अस्पष्ट उत्तरे दिली. त्यानंतर फसवणूक झालेल्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांत केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -