घरमहाराष्ट्रThackeray vs Shinde : अंगार कोण, भंगार कोण हे येणारा काळ ठरवेल; राऊतांचा...

Thackeray vs Shinde : अंगार कोण, भंगार कोण हे येणारा काळ ठरवेल; राऊतांचा शिंदे गटाला टोला

Subscribe

मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक समिकरण आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ज्या शिवाजी पार्क मैदानावर होतो, तेच मैदान मागील वर्षभरापासून चर्चेत आहे. कारण, शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यापासून कोणत्या गटाचा मेळावा शिवाजी पार्कला होणार यामध्ये चढाओढ सुरू आहे. गेल्या वर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कला झाल्यानंतर यावर्षी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यंदा शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल करून मागे घेतला आहे. त्यामुळे यंदाही शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच ‘दसरा मेळावा’ होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. (Thackeray vs Shinde Who will be the embers who will be the scraps time will tell Sanjay Raut challenge to the Shinde group)

संजय राऊत म्हणाले की, शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा हा शिवसेनेच्या विचारांचा अंगार घेऊनच होत असतो. बाळासाहेब ठाकरे असताना आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेसुद्धा दसरा मेळाव्याला या देशामध्ये एक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. आता अंगार कोण, भंगार कोण हे येणारा काळ ठरवेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nashik Drug Case : ड्रग्जच्या पैशातून दादा भुसेंना आर्थिक मदत; संजय राऊतांचा गंभीर आरोप

एकनाथ शिंदे आणि अजित पवार स्वत:चा पक्ष स्थापन करावा

एकनाथ शिंदेंच्या भंगार वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुमचे विचार लोक ऐकायला येणार असलील तर येऊ द्या, तुमच्या विचारांना आम्ही भंगार म्हणणार नाही, परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भंगार म्हणण्याइतपत तुमची जीभ घसरली आहे. तुम्ही मोदी-शाहांच्या कच्छपी लागला आहात हा बाळासाहेबांचा विचार नाही. त्यांचा स्वतंत्र विचार होता. त्यांनी नक्कीच शिवसेनेसोबत युती ठेवली, पण आमचा विचार बदलू शकले नाहीत. त्यामुळे असा तुम्ही कोणता विचार देणार आहात. गद्दारी आणि बेईमानी हा अंगार आहे का? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष स्थापन करावा, असं आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून…; व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राऊतांचा शिंदेंना टोला

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -