घरमहाराष्ट्रनाशिकNashik Kumbh Mela : 'या' मंत्र्याला दिली जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

Nashik Kumbh Mela : ‘या’ मंत्र्याला दिली जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

Subscribe

या मेळाव्याच्या कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असली तरी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत स्थान दिले जाणार आहे.

नाशिक : नाशिकमध्ये 2026-27 मध्ये कुंभमेळा भरणार आहे. या कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्ष पदावर समाधान मानावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.

या मेळाव्याच्या कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असली तरी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत स्थान दिले जाणार आहे. सध्या नाशिक पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये विद्यमान पालकमंत्री दाद भुसे आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच गिरीश महाजन यांना कुंभमेळाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळा चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Dawoodच्या हस्तकासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची पार्टी, Nitesh Rane यांचा विधानसभेत गौप्यस्फोट

कुंभमेळ्याचे कामकाज करण्यासाठी सरकारकडून 4 समिती

कुंभमेळासाठी सरकारने चार समित्या गठीत केली आहे. शिखर समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपाध्यक्ष पद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबल यांच्यासह 8 मंत्र्यांचा शिखर समितीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच उच्चधिकारी समितीचे अध्यक्षपद मुख्य सचिवांकडे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : कृषी संजीवनी योजनेत घोटाळा; दानवेंचे आरोपात तथ्य असल्याची सरकारची कबुली

कुंभ मेळाव्यात लाखो भाविक आणि पर्यटक येतात

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळा आरखडा तयार करण्यात आला असून कामाचे नियोजन, वेळेत काम पूर्ण करणे आणि खर्चला मंजुरी आदी कामासाठी सरकारने चार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. गेल्या वेळ नाशिकच्या कुंभमेळा काळात देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळा मंत्री म्हणून तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची निवड केली होती. त्यावेळी महाजन हे पालकमंत्री असतानाही त्यांच्याकडे जिल्हा समितीची जबाबदारी देण्यात देखील ग्रामविकास मंत्रीकडे अध्यक्ष पद आहे. दरवर्षी नाशिकमध्ये कुंभ मेळाव्यासाठी देशसह जगभरतून लाखो भाविक आणि पर्यटक देखील कुंभमेळ्यात येतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -