घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मनपा निवडणूक : पंचवटीत आरक्षणामुळे अनेकांच्या अडचणी

नाशिक मनपा निवडणूक : पंचवटीत आरक्षणामुळे अनेकांच्या अडचणी

Subscribe

पंचवटी : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी चे मागासवर्ग प्रवर्ग आरक्षण सोडत शुक्रवार दि. २९ रोजी महाकवी कालिदास कला मंदिर येथे पार पडली असून पुर्वीच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणा व्यतिरिक्त मागासवर्ग प्रवर्गाची ३४ जागांसाठीची सोडत काढण्यात आली आहे. त्यात पंचवटीतील ५ जागांवर मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण निघाले असून प्रभाग क्रमांक ४ ब गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, प्रभाग क्रमांक ५ आणि ६ करता अ गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तर प्रभाग क्रमांक ८ हा ४ सदस्यांचा प्रभाग असल्याने यात अ गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव तर ब गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग असे एकंदरीत आरक्षण जाहीर झाले आहे. मे महिन्यात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत पंचवटीत अनुसूचित जाती करता एकमेव प्रभाग क्रमांक ७ मध्ये आरक्षण निघाले असतांना अनुसूचित जमाती महिला राखीव करता ३ जागा, अनुसूचित जमातीसाठी २ जागा, सर्वसाधारण महिला राखीव ९ जागा तर सर्वसाधारण खुला करता १० जागा असे २५ जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले होते.

मे महिन्यात मागासवर्ग प्रवर्ग सोडून काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक ४ अ गट अनुसूचित जमाती महिला, ब गट सर्वसाधारण महिला व क गट खुला, प्रभाग क्रमांक ५ अ गट सर्वसाधारण महिला, ब गट सर्वसाधारण महिला, क गट खुला, प्रभाग क्रमांक ६ अ गट सर्वसाधारण महिला, ब गट खुला, क गट खुला तर प्रभाग क्रमांक ८ अ व ब गट सर्वसाधारण महिला, क व ड गट खुला असे आरक्षण जाहीर झाले होते. परंतु मागासवर्ग प्रवर्ग आरक्षण सोडती नंतर प्रभाग क्रमांक ४ अ गट अनुसूचित जमाती महिला, ब गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, क गट खुला, प्रभाग क्रमांक ५ अ गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब गट सर्वसाधारण महिला, क गट खुला, प्रभाग क्रमांक ६ अ गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, ब गट सर्वसाधारण महिला, क गट खुला तर प्रभाग क्रमांक ८ अ गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, ब गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, क गट सर्वसाधारण महिला आणि ड गट खुला असे आताचे चित्र आहे. आता पंचवटीतील ५ जागांवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षण जाहीर झाले असून प्रभाग क्रमांक ८ हा एकमेव प्रभाग आहे जिथे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव आरक्षण निघाले आहे. आजच्या आरक्षण सोडती नंतर प्रभागातील निवडणूकीतील चुरशीचे चित्र स्पष्ट झालेले असून आता प्रत्येक इच्छुक उमेदवारांना आपल्या स्थानिक नेत्याच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी वशिला लावावा लागणार आहे.

- Advertisement -

राज्यात सत्तांतर नाट्यानंतर भाजप सत्तेत येताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना बदलण्यात यावी या करता मोठ्या प्रमाणात पत्र व्यवहार सुरु असल्याने अनेक इच्छुकांमध्ये निवडणुकीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यात शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या वादामुळे शिवसेनेतील अनेक इच्छुक निवडणूक अयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष ठेवून कुंपणावर बसलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -