घरताज्या घडामोडीकोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात..?, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान

कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात..?, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरामधून संतत प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरूंगात हे ठरवावं लागेल, कडवे हिंदू असाल, ज्यांच्यामते आम्ही हिंदुत्व सोडलंय. ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा असतील त्या सरकारने राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहीजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.

हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम त्यांनी केलंय. राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचं मीठ गेली तीन वर्ष खाताय, त्या मिठाशी त्यांनी नमक हरामी केलीय. जे नवहिंदुत्ववादी आहेत. कडवे हिंदू असतील, मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, ज्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलंय. राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहीजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

तीन महिन्यांत राज्यभरात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व धर्मीय जे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत, त्यांच्यात फूट पाडण्याचं काम हे राज्यपालपदाच्या खुर्चीवर बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीनं केलेलं आहे. सगळे हिंदूसुद्धा चिडलेले आहेत. अमराठी लोकसुद्धा चिडलेले आहेत. कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम केलेलं आहे. महाराष्ट्रातलं जे त्यांनी मीठ खाललंय, त्या मिठाशीसुद्धा नमकहरामी त्यांनी केलेली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी आहेत. त्यांना कोल्हापूरचं वहाण दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मराठी माणसाच्या कष्टामुळे मुंबई उभी, याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -