घरताज्या घडामोडीसोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाळा

Subscribe

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरीही, अनेक विनाकारण भटकंती करत आहेत, सोशल डिस्टन्स ठेवत नाही. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज टाकले जात आहेत. त्यामुळे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 30 एप्रिलपर्यंत कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे.

कोरोनामुळे सध्या समाजामध्ये भितीचे वातावरण आहे. शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे तरी अनेकजण विनाकारण भटकंती करत आहेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. काहीजण सोशल मीडियावर चुकीचे संदेश टाकत आहेत, त्यातून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे संदेश, अफवांमुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धार्मिक तेढ, अनधिकृत वा खोट्या बातम्या प्रसारीत करणे, सोशल मीडियाच्या व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, व्टिटर, टिकटॉक, टेलीग्राम यावरून धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत करून नये. त्यामुळे आयुक्तालय हद्दीमध्ये 30 एप्रिलपर्यंत कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या ग्रुप ऍडमिनवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -