घरमुंबईलॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

Subscribe

५० टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या कामगारांना उपस्थिती एवढाच मिळणार पगार

मुंबईत एकाबाजुला कोरोनाच्या संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून केला जात असून अत्यावश्यक सेवांशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये,असे आवाहन केले जात आहे. मात्र, दुसरीकडे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर कामगारांनीही कामावर हजर राहण्याचे निर्देश देत ५० टक्के उपस्थिती राखण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्यांपेक्षा कमी असेल त्यांचा पगार कापून उपस्थिती एवढाच पगार दिला जाणार आहे. त्यामुळे किमान स्वत:ची ५० टक्के उपस्थिती राखण्यासाठी बिगर अत्यावश्यक सेवेतील महापालिका कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कामावर परतावे लागणार आहे. मात्र आधीच संक्रमणाचा काळ त्यातच बसेस व वाहनांची कमतरता अशा परिस्थितीत महापालिकेच्या कामगारांनी कामावर कसे यायचे हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.

५० टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती; मिळणार तितकाच पगार

कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थितीबाबत मंगळवारी ७ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने जारी करण्यात आलेल्या २० मार्च २०२० च्या परिपत्रकाचा संदर्भ देत एकूण अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती ५० टक्के राहिल याची दक्षता घेण्यात यावी, असे नमुद होते. याच परिपत्रकाचा आधार देत, २३ मार्च ते १४ एप्रिल २०२० पर्यंत एकूण कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांपैकी अत्यावश्यक व आपत्कालिन सेवा वगळता प्रत्येक कामगार, कर्मचारी यांनी त्यांची उपस्थिती कार्यालयीन कामकाजाच्या कालावधीच्या ५० टक्के एवढी राहिल याची दक्षता घ्यावी. जर एखादा कर्मचारी ५० टक्क्यांपेक्षा कमी कालावधीसाठी कार्यालयात उपस्थित राहिला तर त्यांचे त्या कालावधीचे वेतन प्रमाणशीलरित्या आकारण्यात यावे, असे नमुद केले. याचा अर्थ कामगार,कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्यांच्या उपस्थितीएवढेच वेतन त्यांना दिले जाणार आहे. मात्र, एखादा कर्मचारी नैमित्तिक रजा, अर्जित रजा, अर्धवेतनी रजा किंवा रुपांतरीत रजा मंजूर करून रजेवर असल्यास त्याचीही नोंद सॅप प्रणालीत घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.

- Advertisement -
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना रोहित पवारांचा विरोधकांना चिमटा!

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेने तातडीने व महत्वाचे कामकाज चालू राहण्याच्या दृष्टीकोनातून सहआयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख, सहायक आयुक्त यांनी आपल्या नियंत्रणाखाली अत्यावश्यक तसेच आपत्कालिन सेवा वगळता सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलवता एक दिवसाआड कार्यालयात बोलवावे अशा आदेशाचे परिपत्रक २० मार्च २०२० रोजी काढण्यात आले होते. परंतु त्यानंतर राज्य शासनाने २५ टक्के व ५ टक्के उपस्थितीची परिपत्रके जारी केली. परंतु महापालिकेने आपले ५० टक्के उपस्थितीचे परिपत्रक कायम ठेवले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही सुट्टी समजून घरी बसणे पसंत केले. अत्यावश्यक व आपत्कालिन सेवा वगळता इतर खात्यांच्या व विभागांच्या कामगार, कर्मचाऱ्यांनी सेवेत येणे टाळले.

कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक

एका बाजुला महापालिका प्रशासन ५० टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगत आहे. मात्र, दुसरीकडे बेस्टच्या बसेसमध्ये अत्यावश्यक वगळता कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता तसेच पोलिसही बिगर अत्यावश्यक सेवांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास मज्जाव करत होते. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची मोठी अडचण झाली असून जे कर्मचारी आजवर लॉकडाऊनमध्ये कामावर गेलेले नाही, ते आपले ५० टक्के उपस्थिती राखण्यासाठी बुधवारपासून कामावर रुजू होतील. एकाबाजुला संक्रमणाचा अधिक काळ सुरु आहे, आणि दुसरी बेस्टच्या बसेसही रस्त्यांवर कमी धाव आहेत,अशा परिस्थितीत कामगारांनी कामावर कसे यायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

2 प्रतिक्रिया

  1. Mahanager palikene je ajari karmachari jyanchi ekahi sutti baki nahi ani nailajane kamavar hajar zale parantu ya mahasankatamule tyana punha ghari thambave lagat ahe binpagari tyanchyasathi kay niyojan kele kiva karnar. Karan emergency duty karnyasathi tya ajari vyaktila swatache pran alredy dhokyat astana ajun aplyasah parivarala samajala dhokyat ghalne kitpan yogya asel. Je treatment var ahet pan sutti NH. Kamavar gele nh tar pagar nh asha atyavshyak karmcharyani kay karave kase jagave. Udaharnarth cancer. TB. MDR. XDR. Krupaya yanchi pn nond whayala havi.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -