घरमहाराष्ट्रनाशिकलोकअदालतमध्ये २३३० प्रकरणांचा निपटारा

लोकअदालतमध्ये २३३० प्रकरणांचा निपटारा

Subscribe

लोकन्यायालयाला नाशिककरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबईतर्फे शनिवारी (ता.१३) राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालय येथे करण्यात आले होते. लोकअदालतमध्ये २३३० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोकन्यायालयात दावा दाखल पूर्व प्रकरणामध्ये समजोता घडून आला व १४ हजार ७४७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १३ हजार ५४५ प्रकरणे व दावा पूर्व दाखल प्रकरणे १ लाख ६ हजार ७७५ प्रकरणे ठेवण्यात आली. प्रलंबित प्रकरणांपैकी फौजदारी ८१८, बँकेची ६४, वाहन अपघात प्रकरने २०५, कामगार विषयक प्रकरणे २, कौटुंबिक वाद १३३, भूसंपादन ५, दिवाणी दावे २२७, इतर प्रकरणे २ अशी एकूण २३३० प्रकरणांचा लोकन्यायालयात निपटारा करण्यात आला.

- Advertisement -

राष्ट्रीय लोकअदालत न्यायाधीश रविंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. अदालत यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रसाद कुलकर्णी, सर्व न्यायिक अधिकारी, वकील आदींनी सहकार्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -