घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या डीएनए फॉरेन्सिक लॅबसाठी २६.८५ कोटी

नाशिकच्या डीएनए फॉरेन्सिक लॅबसाठी २६.८५ कोटी

Subscribe

सक्षमीकरणासाठी मंत्रीमंडळाची निधीला मान्यता, दोन महिन्यात उपसंचालक, सहायक संचालक, सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहायक यांची नेमणूक केली जाणार, तसेच डीएनएसाठी अत्याधुनिक पीसीआर मशीनही येणार

नाशिक डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणासाठी मंत्रीमंडळाने २६ कोटी ८५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. या लॅबमध्ये दोन महिन्यात उपसंचालक, सहायक संचालक, सहायक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक सहायक यांची नेमणूक केली जाणार आहे. डीएनएसाठी अत्याधुनिक विविध प्रकराच्या पीसीआर मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेला गुन्ह्यांची उकल करताना वेळेची बचत होणार आहे.

दिंडोरी रोडवर ऑगस्ट २०१७ पासून प्रादेशिक न्यायवैधक वैज्ञानिक प्रयोगशाळा सुरू झाली आहे. मातृत्व- पितृत्व तपासणी, अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे, खून, बलात्कार, चोरी, दरोडा या प्रकरणांच्या चाचण्यासाठी डीएनए चाचणी केली जाते. डीएनए विभागात मर्यादित मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीअभावी महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांच्या चाचण्या करण्यात अडचणी येत होत्या. राज्य शासनाने डीएनए लॅब सक्षमीकरणाचा निर्णयामुळे मनुष्यबळ वाढणार असून अद्ययावत पॉलिमरेझ चेन रिअ‍ॅक्शन (पीसीआर), रिअल टाइम पीसीआर यंत्रसामग्री येणार आहे. लैंगिक अत्याचार करून मुलांना उद्धवस्त करणार्‍या आरोपींना कडक शासन करण्यासाठी डीएनए चाचण्यांचा मोठा आधार ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -