घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावात गुंडाचा तासभर सशस्त्र हैदोस

मालेगावात गुंडाचा तासभर सशस्त्र हैदोस

Subscribe

मालेगाव शहरातील आयेशानगर व पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत पाच जखमी; तीन गंभीर

मालेगाव शहरातील आयेशानगर व पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास १० ते ११ गुंडांच्या टोळक्याने हातात शस्त्रे घेवून हैदोस घातला. सुमारे तासभर रस्त्यांवर हा हैदोस सुरु राहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुंडांच्या या हल्ल्यात पाच जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान पवारवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे. ’फिर्याद मागे घेण्यास नकार दिल्याने’ हा हल्ल्याचा प्रकार झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास १० ते ११ गुंडांच्या टोळीने मिल्लत मदरसा पाठीमागील यंत्रमाग कारखान्यात व बिस्मिला हॉटेल सब्जी मार्केट नवी वस्ती परिसरात हा हल्ला केला. याप्रकरणी मोहम्मद अबीद मोहम्मद जाबीर (वय ३३ , रा. बाग कासीम, नवी वस्ती ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संशयित आरिफ कुरेशी व त्यांच्या नातेवाईक व मित्रांनी फिर्यादी मोहम्मद अबीद याच्या भावाने संशयित आरोपी कुरेशीवर दाखल केलेली आधीची फिर्याद मागे, घ्यावी असा दबाव आणला होता. मात्र, ही फिर्याद मागे घेण्यास नकार दिल्याने आरिफ कुरेशी व अन्य १० ते ११ गुंडांनी हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. रात्री उशिरा हल्लेखोरांनी प्रथम नॅशनल सायझिंग समोरील मनपा प्राथमिक शाळेच्या आवारात अय्युब खान (३२, रा. सोनिया कॉलनी) यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी आपल्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली मात्र, आपण येथून पळ काढल्याने बचावल्याचे हारून यांनी सांगितले. हल्लेखोर येथेच न थांबता त्यांनी हारूनचा पाठलाग करीत मोर्चा जाफरनगरकडे वळल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. वाटेत त्यांनी काही वाहनांचे नुकसान देखील केले. तसेच एका हॉटेलची नासधूस केली. हल्लेखोरांचा हा हौदास सुरु असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. हल्लेखोर यानंतर थेट बारदाननगर व नवी वस्ती परिसराकडे वाल्याने त्यांनी तेथे पवन संतोष पवार ( २२, रा. हरिओम नगर, कलेक्टरपट्टा) व सोहेल अंजुम मोहंमद यासीन (१९, रा.फार्मसी नगर) तरुणास मारहाण करून पळ काढला. पुढे यंत्रमाग कारखान्यात घुसुन फिर्यादी मोहम्मद अबीद मोहम्मद जाबीर ( वय ३३ , रा. बाग कासीम नवी वस्ती ) तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यात फय्याज अहमद नियाज अहमद (रा. गोल्डन नगर ) हाही गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात हलवले होते.

- Advertisement -

११ जणांविरुद्ध गुन्हा, तिघे ताब्यात

दरम्यान, जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शहरातील आयेशानगर व पवारवाडी पोलीस ठाणेच्या काही अंतरावरच या हल्लेखोरांनी हैदोस घातल्याने रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपअधीक्षक रत्नाकर नवले, निरीक्षक मसुद खान, गुलाबराव पाटील, सहायक निरीक्षक गणेश गिरी यांनी धाव घेतली. गुंडाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरिफ कुरेशी, ताहीर अन्सारी, मोहम्मद कुरेशी, मोहम्मद सलमान, शोएब फिरोज, इजाज शफिक उल्ला, मथन चोरवा, अनिस बादशाह, लोडो शकील यांसह ११ जणांवर गुन्हा दाखल केला. शनिवारी (२ फेब्रुवारी) दुपारपर्यंत यातील तिघांना ताब्यात घेतले. परिसरात बंदोबस्त तैनात केला असून दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -