घरक्राइमजिल्ह्यात जानेवारीपासून रस्ते अपघातात ७५५ बळी

जिल्ह्यात जानेवारीपासून रस्ते अपघातात ७५५ बळी

Subscribe

नाशिक : शनिवारी (दी.८) औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल चौकात झालेल्या अपघातात १२ निष्पापांचा बळी गेला. यामुळे रस्ता सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून देशभरात महामार्गावरील ब्लॅक स्पॉटची यादी काही महिन्यापूर्वी जाहीर केली होती. त्यात नाशिक जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ब्लॅक स्पॉट असल्याच समोर आले होते. आता, जिल्ह्यात जानेवारी २०२२ पासून झालेल्या रस्ते अपघातांच्या बाबत नवी माहिती समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कलावधीत जिल्ह्यात झालेल्या अपघातांमध्ये एकूण ७५५ नागरिकांना आपला जीव गमावला आहे. जर सरासरी काढली तर दररोज ३ नागरिकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

जानेवारी  २०२२ ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ९०६ मोठ्या अपघातांमध्ये ७५५ लोकांना जागीच मृत्यू झाला, एकूण ६३५ अपघात झाला त्यावेळी गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. तर, १३३ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यानुसार नाशिक जिल्ह्यात दररोज सरासरी ३ जन रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहेत. जिल्ह्यात झालेल्या ९०६ मोठ्या अपघातांपैकी बहुतांश अपघात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर घडून आलेले आहेत. याबाबत विशेष उपाययोजना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या.

- Advertisement -
ग्रामीण हद्दीत अधिक धोका

जिल्ह्यात झालेल्या महामार्गावरील एकूण ९०६ मोठ्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या ७५५ मृत्यूमध्ये शहरात सप्टेंबर अखेरपर्यंत १२० तर ग्रामीण हद्दीत ऑगस्ट अखेरपर्यंत ६३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण हद्दीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या एकूण अपघातांचा आणि मृत्युंचा अधिकृत आकडा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे जर तोही आकडा जोडला तर ती संख्याही मोठी होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट 

पिंपरी फाटा,(इगतपुरी), दहावा मैल,(ओझर), मुंगसे फाटा,(मालेगाव तालुका), वडाळीभोई शिवार, खडकजाम शिवार,(वडनेर भैरव), उमराणे (देवळा), एसटी कॉलनी, कुंदेवाडी फाटा (सिन्नर), चांदवड चौफुली, राहुड घाट (चांदवड), मुंढेगाव फाटा (घोटी), धनगरबाबा मंदिर, विल्होळी गाव, आठवा मैल (नाशिक तालुका), माळवाडी शिवार, खोपाडी फाटा, सब स्टेशन (वावी), शिरवाडे फाटा (पिंपळगाव), महिरवणी शिवार (त्र्यंबकेश्वर), बोकडदरे शिवार (निफाड), पांढुर्ली फाटा (सिन्नर), सावरगाव शिवार (येवला), कश्यपी धरण (हरसूल), वीरगाव (सटाणा), सावकी फाटा (सटाणा), कातरवेल बारी (जायखेड), चिराईबारी (जायखेडा), म्हसोबा माथा (लासलगाव), ओझरखेड (वणी), वसालीबारी घाट (घोटी), दीक्षी गाव (ओझर), रामपूर फाटा (वावी), पालखेड फाटा, जोगमोडी गाव (पेठ), कवटी फाटा (वाडीवर्हे), रायगडनगर (वाडीवर्हे), देवरपाडे फाटा (मालेगाव), जीएमडी कॉलेज (सिन्नर), देवपूर फाटा (वावी), हरसूल फाटा (सिन्नर), गोंदेगाव फाटा (सायखेडा), भावडबारी घाट (देवळा), शिवरे फाटा (निफाड), वाघोबा मंदिर (त्र्यंबकेश्वर), अंदरसुल मार्केट (येवला), वालदेवी पूल (वाडीवर्‍हे), चाळीसगाव फाटा (मालेगाव), चिंचवे (देवळा), हॉटेल पुरोहित (सिन्नर), आडवा फाटा (सिन्नर), मालेगाव फाटा (सिन्नर), केला कंपनी (सिन्नर), चाचडगाव (दिंडोरी), देवीचा माथा (चांदवड), टेल्को शोरुम (छावणी), मिरगाव फाटा (वावी), स्टार हॉतेल (पवारवाडी), डुबरे नाका (सिन्नर), घोरवड घाट (सिन्नर), वनारवाडी फाटा (दिंडोरी), रोकडोबा फाटा (छावणी), साकुरफाटा (वाडिवर्‍हे), आठंबेगाव (कळवण), नाकेपाडा (हरसूल), नांदगाव शिवार (वाडिवर्‍हे), सुकेणा गाव (ओझर), जोपूळगाव (पिंपळगाव), कसरनाला (एमआयडीसी, सिन्नर), गिरणारे (नाशिक तालुका), कानमंडाळे गाव (वडनेर भैरव), वडनेर भैरव मंदिर, दहेगाव (चांदवड), मावडी फाटा (वणी), वाके फाटा (मालेगाव तालुका), संगमनेर नाका (सिन्नर), रेस्ट हाऊस (सिन्नर), कोकणगाव फाटा (पिंपळगाव), बेलू फाटा (सिन्नर), आगसखिंड फाटा (सिन्नर), चांदुरी चौफुली (सायखेडा), लखमापूर फाटा (वणी), ओझरखेड धरण (वणी), पारेगाव चौफुली (येवला शहर), गोबापूर गाव (कळवण), बेहड पाडा (हरसूल), लोणवडी पूल (पिंपळगाव), बोकदरा गाव (निफाड), धुळवंडी फाटा (वावी), लासलगाव फाटा (मनमाड), सिन्नर फाटा (घोटी), मुंडेगाव (घोटी), मुसळगाव फाटा (सिन्नर एमआयडीसी), मोहदरी घाट (सिन्नर एमआयडीसी), सावडगाव फाटा (पवारवाडी), गावठाण (सिन्नर), आराई शिवार (सटाणा), वरवंडी (दिंडोरी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -