घरमहाराष्ट्रनाशिकपंढरीच्या वाटेवर मृत पावलेल्या लहानग्याचे करणार देहदान

पंढरीच्या वाटेवर मृत पावलेल्या लहानग्याचे करणार देहदान

Subscribe

सिन्नर बायपासनजीक शुक्रवारी, २८ जूनला पहाटेच्या सुमारास घडली दुर्घटना, यापुढे १६ वर्षांखालील व्यक्तींना सहभागी न करण्याचा नाशिक सायकलीस्टचा निर्णय

पंढरपुरची वारी सायकलने करणाऱ्या ८ वर्षीय चिमुकल्याचा आज पहाटे सिन्नरजवळ अपघाती मृत्यू झाला. खरे तर ही घटना आई वडिलांसाठी कितीतरी दु:खद. मात्र तरीही त्यातून सावरत त्यांनी या आपल्या मुलाचा देह दान करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. प्रेम सचिन नाफडे असे मृत पावलेल्या लहानग्या सायकलस्वाराचे नाव आहे.

अपघाती मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी प्रेमचा मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर त्याचे नेत्रदान व त्वचादान केलं जाणार आहे.

- Advertisement -

कसा झाला अपघात?

नाशिकपुणे महामार्गावरील सिन्नर बायपासनजीक शुक्रवारी, २८ जूनला पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात सायकल वारीत सहभागी नाशिकमधील ८ वर्षीय प्रेम सचिन नाफडे मृत पावला होता. तो दुसरीत शिकत होता. पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत प्रेम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ज्या ट्रकने त्याला धडक दिली तो चालक मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नाशिक सायकलिस्ट असोशिएशनतर्फे दर वर्षी पंढरपूरपर्यंत सायकल वारी काढण्यात येते. त्यात मोठ्यांसोबत लहानांचाही समावेश असतो. आपल्या आईवडिलांसोबत प्रेमही या वारीत सहभागी झाला होतादरम्यान, यापुढे सायकल वारीत १६ वर्षांखालील व्यक्तींना सहभागी न करण्याचा निर्णय नाशिक सायकलिस्टने घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -