घरताज्या घडामोडीतोतया जवानांनी गोवर्‍या विक्रीतून घातला ९५ हजारांना गंडा

तोतया जवानांनी गोवर्‍या विक्रीतून घातला ९५ हजारांना गंडा

Subscribe

देवळाली कॅम्प येथून जवानांच्या नावाने दोन भामट्यांनी गोशाळेच्या विश्वस्तांशी संपर्क साधत गोशाळेच्या १० हजार गोवर्‍या खरेदी करण्याचे आश्वासन दिले. गोवर्‍या विक्रीसाठी मोठी संधी आल्याने व लष्कराचे जवानच खरेदी करणार असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवणे गोशाळेच्या एका महिलेस महागात पडले. लष्कराचे एलआयसी अकाऊंट असून खात्री करण्यासाठी पाच रुपये आणि त्यानंतर २० हजार व ४० हजार रुपये गुगल पे वर पाठवा, अशी भामट्यांनी बतावणी केली. त्याबदल्यात परत दुप्पट रक्कम पाठविली जाईल, असे सांगत दोघांनी ऑनलाईन ९४ हजार ९९८ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन हायटेक भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल कुमार, मंजित सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोशाळा संस्थेचे विश्वस्त महेंद्र नेमिचंद पोतदार यांच्या मोबाईलवर संशयित साहिल कुमार याने २८ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. भारतीय सेना, देवळाली कॅम्प येथून बोलत असल्याचे सांगितले. गोशाळेकडून १० हजार गोवर्‍या खरेदी करायचे असल्याचे त्याने सागितले. त्यानंतर शैलेश सिंघानिया यांनी साहिल याच्याशी गोवर्‍या विक्रीबाबत बोलणी केली. सिनियर मंजित सिंग याने सुरुची व शैलेश सिंघानिया यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत विश्वास संपादन केला. दोघांनी सिंघानिया यांना व्यवहारापोटी अ‍ॅडव्हान्स पाठविण्याचे सांगून त्यांचे गुगल पे वर ९४ हजार ९९८ रुपये पाठविण्यास भाग पाडले. ती रक्कम परत न करता दोघांनी त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक साखरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -