घरताज्या घडामोडीMohammad Paigambar Cartoon : असदुद्दीन ओवैसींनी केला हिंसेचा निषेध!

Mohammad Paigambar Cartoon : असदुद्दीन ओवैसींनी केला हिंसेचा निषेध!

Subscribe

फ्रान्समध्ये एका शिक्षिकेने इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र शाळेत दाखवल्यानंतर सुरू झालेल्या हिंसेच्या घटनांमुळे जगभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जगभरातल्या अनेक मुस्लीम संघटनांनी व्यंगचित्र दाखवल्याच्या प्रकरणावरून सुरू झालेल्या हिंसेचं समर्थन केलं आहे. मात्र, अनेकांनी त्याचा निषेध देखील केला आहे. भारतातील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश आहे. ओवैसींनी व्यंगचित्र प्रकारावर खेद व्यक्त केला असला, तरी त्याविरोधात होणाऱ्या हिंसेला चुकीचं ठरवलं आहे. त्यामुळे एकीकडे मुनव्वर राणांसारखे प्रसिद्ध शायर हिंसेचं अप्रत्यक्षपणे समर्थन करत असताना असदुद्दीन ओवैसींकडून मात्र त्याचा निषेध केला जात आहे.

काय म्हणाले ओवैसी?

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ओवैसी म्हणाले, ‘पैगंबर मोहम्मद साहेबांवर कार्टून बनवलं गेल्यामुळे मला त्याचं फार दु:ख झालं आहे. पण त्यासाठी होणाऱ्या हिंसक घटना पूर्णपणे चुकीच्या आहेत. जिहादच्या नावाखाली निरपराध लोकांची हत्या करणारे फक्त खूनी असू शकतात. इस्लाम अशा हिंसेचं समर्थन करत नाही. तुम्ही जिथे राहाता, तिथला कायदा तुम्हाला पाळावाच लागेल. तुम्ही कुणाचा जीव नाही घेऊ शकत’.

- Advertisement -

नक्की काय घडलंय फ्रान्समध्ये?

फ्रान्समध्ये काही दिवसांपूर्वी एका शिक्षिकेने शाळेमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र दाखवल्यामुळे हा वाद सुरू झाला. काही दिवसांनी या शिक्षिकेची संतापलेल्या एका विद्यार्थ्याने गळा चिरून हत्या केली. अजून एका घटनेत चर्चमध्ये शिरून काही ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले. या घटनांनंतर फ्रान्स सरकारकडून मुस्लीम कट्टरतावाद्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली असून अनेक मुस्लीम देशांनी याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -