घरक्राइमनाशकात जोधपूरमध्ये खरेदी केलेले देशी पिस्तूल जप्त

नाशकात जोधपूरमध्ये खरेदी केलेले देशी पिस्तूल जप्त

Subscribe

तीन मित्रांना अटक ;नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

नाशिक : मित्राच्या सांगण्यावरून एका तरुणाने जोधपूर (राजस्थान) येथून देशी बनावटीचे पिस्तूलासह एक काडतूस खरेदी करुन ते दुसर्‍या मित्राच्या घरी लपवून ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी तिसर्‍या मित्राच्या ताब्यातून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

मुकेश फुआरामजी सोळंकी (वय २०, रा.भाभानगर, नाशिक), सचिन राजेंद्र अंधारे (३७, रा. गुरुकृपा बंगला क्र.१, शिक्षक कॉलनी, धात्रक, फाटा, नाशिक), मंगेश अरुण कोथमिरे (३४, रा. सूर्यवंशी चाळ, अमृतधाम, पंचवटी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी नाशिक शहरात शस्त्रांसह दहशत माजवणार्‍या गुन्हेगारांची गुंडागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा गुन्हेगारांना इशारा दिला आहे. शरीराविरुद्ध गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांच्या हालचालीवर पाळत ठेवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि.२०) नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, पोलीस अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र काशीनाथ बागूल, पोलीस हवालदार प्रवीण अशोक वाघमारे, प्रदिप चंद्रकांत म्हसदे, सुरेश माळोदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, नाझीमखान पठाण यांना एका तरुणाने राज्यस्थानातून देशी बनावटीचे पिस्तूल आणल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

- Advertisement -

पोलिसांनी मुकेश सोळंकी यास अटक केले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने जोधपूर, राजस्थान येथून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस सचिन राजेंद्र अंधारे याच्या सांगण्यावरून आणल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अंधारे याच्याकडे विचारणा केली. त्याने त्याने देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस त्याचा मित्र मंगेश अरुण कोथमिरे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्याने पिस्तोल व काडतूस घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल व एक काडतूस जप्त केले. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रविण वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -