घरमहाराष्ट्रनाशिक१२ दिवसात अठ्ठेचाळीसशे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांच्या तिजोरीत लाखोंची वाढ

१२ दिवसात अठ्ठेचाळीसशे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांच्या तिजोरीत लाखोंची वाढ

Subscribe

४३५९ विनाहेल्मेट चालकांकडून २१.७९ लाख ; ४५४ ट्रिपल सीट चालकांकडून ४.५४ लाख दंड वसूल

नाशिक : शहर वाहतूक पोलिसांनी १२ दिवसांत विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या ४ हजार ३५९ दुचाकीचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी २१ लाख ७९ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. तसेच ट्रिपलसीट दुचाकी चालवल्याप्रकरणी ४५४ कारवाई करण्यात आल्या. त्या चालकांकडून ४ लाख ५४ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियमांचे उलंघन करणार्‍या वाहनचालकांवर केली जात आहे.

नाशिक शहरात वाढणार्‍या रस्ते अपघातामध्ये होणारी प्राणहाणी टाळण्यासाठी दुचाकीचालकांनी हेल्मेट परीधान करणे अनिवार्य आहे. दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करू नये, यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जात आहे. परंतु, विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याच्या प्रमाणात घट न होता दुचाकीस्वाराच्या अपघातात वाढ होवून दुचाकी वाहनचालक मयत होण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. शहर वाहतूक शाखेच्या युनिट१ ते ४ च्या कार्यक्षेत्रात २८ जून ते ९ जुलै २०२३ या कालावधीत विनाहेल्मेट वापराची व ट्रिपलसीट प्रवास न करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस आयुक्तांच्या आदेशाने विनाहेल्मेट व ट्रिपलसीट मोहीम राबविण्यात आली.

- Advertisement -

वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट ४ हजार ३५९ दुचाकीचालकांवर कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ लाख ७९ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. तसेच ट्रिपलसीट दुचाकी चालवल्याप्रकरणी ४५४ कारवाई करण्यात आल्या. त्या चालकांकडून ४ लाख ५४ हजार दंड वसूल करण्यात आला. दुचाकीचालकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे. दुचाकी वाहनांवर ट्रिपलसीट प्रवास करू नये, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे. बेशिस्त वाहनचालक वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास संबंधित चालकावर कारवाईही केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -