घरक्राइमनाशकात भाजपाच्या 'बाहुबली' नेत्याच्या घरावर हल्ला; आईलाही धमकावले

नाशकात भाजपाच्या ‘बाहुबली’ नेत्याच्या घरावर हल्ला; आईलाही धमकावले

Subscribe

नाशिक : शहरात खून, हल्ले, टोळीयुद्धं, दमबाजी, टवाळखोरी यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. भाजपचे सातपुर परिसरातील बाहुबली नेते म्हणून ओळख असलेल्या पदाधिकार्‍याच्या घरावर ७ ते ८ जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटनीस विक्रम नगारे यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हल्ला झाला त्यावेळी विक्रम नगारे घरात उपस्थित नव्हते. हल्लेखोरांनी घरात उपस्थित असलेल्या नागरे यांच्या आई माजी नगरसेविका इंदुमती नागरे यांना धमकावले आहे. हल्लेखोरांनी आपल्यासोबत अनेक हत्यारे आणलेली होती. यामुळे जर नागरे स्वत उपस्थित असते तर अनुचित प्रकार घडू शकला असता असे बोलले जात आहे.

नाशिक शहरात पोलीस प्रशासनाचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत आहे. सातपुर मधील भाजपा नेते विक्रम नागरे यांच्या भरवस्तीत असलेल्या घरात ७ ते ८ जनांचे टोळके सोबत, सुरे, चाकू, दांडके, कोयते घेऊन येतात. त्यांच्या घरावर दगडफेक करतात. त्यानंतर शिवीगाळ करत त्यांच्या घरात प्रवेश करतात. आणि त्यांच्या मातोश्रीना धमकावत तोडफोड केली जाते. हा सगळा प्रकार काही मिनिटे भरवस्तीत सुरू असतो. ही बाब नक्कीच शहराच्या एकूण शांतता, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून गंभीर आहे. हा सर्व प्रकार जरी दोन दिवसापूर्वी घडला असला तरी, त्याबाबत सीसीटीव्ही फुएज आत्ता समोर आल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

- Advertisement -

सीसीटीसीमध्ये कैद झालेल्या दृश्यात ७ ते ८ जनांचे टोळके काही काळ नागरे यांच्या घरासमोर चकरा मारताना दिसताय. त्यानंतर अचानक ते आक्रमक होत टोळक्याकडून विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला करण्यास सुरवात होते. ज्यात सुरवातीला हे टोळके नागरे यांच्या घरावर दगडफेक करतात. त्यांच्या घराबाहेर असलेले भाजपाचे पोस्टर फाडतात. तोडफोड करतात. त्यानंतर थेट घरात प्रवेश करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. विक्रम नागरे हा हल्ला झाला त्यावेळी घरी उपस्थित नव्हते. जर, ते घरी उपस्थित असते तर अनुचित प्रकार घडू शकला असता असे बोलले जात आहेत. दरम्यान, याबाबत सातपुर पोलीस ठाण्यात ७ जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी नागरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -