घरमनोरंजनरोमान्स, अॅक्शन असलेल्या 'बेभान' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

रोमान्स, अॅक्शन असलेल्या ‘बेभान’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Subscribe

प्रेमचा त्रिकोण असलेला "बेभान" चित्रपट 11 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

रोमान्स आणि अॅक्शन असलेलया ‘बेभान’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षांच्या भेटीला आला आहे. अनुपसिंग ठाकूर, मृण्मयी देशपांडे (sanskruti balgude), संस्कृती बालगुडे असा प्रेमचा त्रिकोण असलेला “बेभान” चित्रपट 11 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

“बेभान” चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. शशिकांत पवार प्रोडकशनच्या अंतर्गत मधुकर (अण्णा)देशपांडे रायगावकर आणि शशिकांत शीला भाऊसाहेब पवार यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ असे उत्तम चित्रपट केल्यानंतर ‘बेभान’ (bebhan marathi movie) हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन आले आहेत.

- Advertisement -

दिनेश देशपांडे यांच्या कथेवर आधारित बेभान या चित्रपटाची पटकथा नितीन सुपेकर यांनी लिहिली आहे. या चित्रपटात मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनुपसिंग ठाकूर मराठीत चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. अनुपसिंगने बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली आहे. अनुपसिंग ठाकूर यांच्या सोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrynmayee deshpande), संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

- Advertisement -

श्रीमंत पार्श्वभूमी असलेला नायक आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दोन तरुणी, त्यांच्यामुळे नायकात होणारा बदल हीच या चित्रपटाची कथा आहे. अॅक्शन, रोमान्स असलेल्या कथेत उत्तम अभिनेते, उत्कृष्ट तांत्रिक बाजू, उत्तम संगीत यांचा मिलाफ या चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


हे ही वाचा – शिवप्रताप गरुडझेपची गर्जना आता ओटीटीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -