घरमहाराष्ट्रनाशिकबाजार समिती निवडणूक : नांदगावला उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

बाजार समिती निवडणूक : नांदगावला उमेदवारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Subscribe

नाशिक : येथील कृषी उपन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.३) आमदार सुहास कांदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), भाजप आदींनी कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केल्याने बाजार समिती आवाराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सात वर्षानंतर होणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आतापासूनच चुरस पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या सोसायटी गटातील ११ जागांसाठी ६२४, ग्रामपंचायत गटातील ४ जागांसाठी ५७५, व्यापारी गटाच्या २ जागांसाठी ३५६ तर, हमाल-मापारी गटाच्या १ जागेसाठी ११२ असे १ हजार ६६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सोसायटी गटासाठी ८१, ग्रामपंचायत गटासाठी ४८, व्यापारी गटासाठी १३, हमाल-मापारी गटासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात कृउबा माजी सभापती तेज कवडे, पंचायत समिती माजी सभापती विलास आहेर, कैलास पाटील, दर्शन आहेर, भास्कर कासार, रामचंद्र चव्हाण, सचिन जेजुरकर, दिगंबर भागवत, नंद दिलीप, उदय पवार, समाधान पाटील, माजी जि.प. सदस्य अशोक जाधव, दीपक खैरनार, विजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष रामनिवास कलंत्री आदींचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -