घरताज्या घडामोडीवाझेमागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

वाझेमागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Subscribe

सोमवारी रात्री ठाण्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याआधी देखील ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गटातील राडा हा हाणामारीपर्यंत गेलेला आहे. ठाकरे गटाच्या युवती रोशनी शिंदे यांना ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी वाझेमागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर फडतूस कोण आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. खरं म्हणजे दोन-दोन मंत्री तुरूंगात गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत सुद्धा जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत. जे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात. त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

जे वाझेच्या मागे लाळ घोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी मागतात. त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. अडीच वर्षात घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भोई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोकं आहोत. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही. त्यांच्या या थयथयाटाला उत्तर देण्याचं कारणच नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि विरोधकांचे लाळ घोटता. फक्त खुर्चीकरता लाळ घोटेपणा करता. मग खरा फडतूस कोण?, हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहितीये. त्यामुळे त्यांनी कुठलीही भाषा वापरली असली तरी त्यापेक्षा खालची भाषा मी बोलू शकतो. कारण मी नागपूरचा आहे. याचं उत्तर त्यांना जनता देईल, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मी पाच वर्ष राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास होत होतोय. काही लोकं पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मी गृहमंत्री पद सोडणार नाही. तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृहमंत्री आहे. जो चुकीचं काम करेल त्याला मी तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : ठाण्यातील घटना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच; संजय राऊतांचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -