Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र पोळ्याचा सण साजरा केला अन् अनर्थ झाला; जवान योगेश शिंदे अनंतात विलीन

पोळ्याचा सण साजरा केला अन् अनर्थ झाला; जवान योगेश शिंदे अनंतात विलीन

Subscribe

नाशिक : भारतीय सैन्य दलात राजस्थान येथे सेवेत असलेले खडक माळेगावचे सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांचे शुक्रवारी (दि. १५) अपघाती निधन झाले. शनिवारी (दि. १६) खडक माळेगाव येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. (Yogesh Sukhdev Shinde, son of Khadak Malegaon, who was serving in the Indian Army in Rajasthan, passed away accidentally)

शनिवारी दुपारी देवळाली कॅम्प येथून भारतीय सैन्याच्या गाडीतून योगेश सुखदेव शिंदे यांचे पार्थिव खडक माळेगाव येथे आणल्यानंतर फुलांनी सजवलेल्या भारतीय सैन्याच्या गाडीतून योगेश शिंदे यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘योगेश शिंदे अमर रहे, भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रा प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर भारतीय सैन्याच्या अधिकार्‍यांनी त्यांना मानवंदना दिल्यानंतर योगेश शिंदे यांचे भाऊ श्रीहरी शिंदे यांनी त्यांच्या पार्थिव देहाला अग्निडाग दिला. यावेळी योगेश शिंदे यांचे वडील सुखदेव काशिनाथ शिंदे, आई मीराबाई सुखदेव शिंदे, पत्नी मोहिनी शिंदे व ३ वर्षांचा मुलगा शिवराज व भाऊ श्रीहरी शिंदे यांनी अंतिम दर्शन घेतले. योगेश सुखदेव शिंदे हे पोळा सणानिमित सुट्टी घेऊन खडक माळेगाव येथे घरी आले होते.

- Advertisement -

पोळ्याचा सण साजरा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ते काही कामानिमित्त मोटारसायकलवरून वनसगाव रस्त्यावरून जात असताना त्याचवेळी समोरून येणार्‍या पीकअप व त्यांच्या मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन योगेश सुखदेव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता. या अंतिम संस्कारप्रसंगी देवळाली कॅम्प येथील भारतीय सैन्यातील अधिकारी मेजर छत्री, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचे स्विय सहायक डॉ. उमेश काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे, माजी पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, सोमनाथ पानगव्हाणे, बबनराव शिंदे, खडक माळेगावचे सरपंच जगदीश पवार, ग्रामपंचायत सदस्य, विकास रायते, हभप निवृत्ती महाराज रायते, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -