घर उत्तर महाराष्ट्र "ओझोन मुळे वाढवली महागाई"; हवामान अभ्यासकाच्या 'या' दाव्याने खळबळ

“ओझोन मुळे वाढवली महागाई”; हवामान अभ्यासकाच्या ‘या’ दाव्याने खळबळ

Subscribe

नाशिक : जागतिक व भारतीय अर्थव्यवस्था तसेच आपल्या किचनच्या बजेटला आग लावत ते पेटविण्याचे काम ग्राउंड लेवल ओझोन करीत आहे. तुरडाळीचे भाव ३७ टक्के वाढले, गहू-तांदूळ, कडधान्ये आदी सर्व कडाडले यामागे जमिनीलगतचा वाढलेला ओझोन देखील लक्षणीय रीत्या कारणीभूत असल्याचा दावा हवामान अभ्यासक प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांनी केला. ओझोन दिनानमित्त मविप्र संस्थेच्यावतीने केटीएचएम महाविद्यज्ञलयात आयोजीत विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

भुगोल विभागाच्यावतीने आयोजीत या कार्यक्रमप्रसंगी बोलतांना प्रा. जोहरे म्हणाले, मान्सून पटर्न बदलाबरोबरच, वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेवर विपरीत परीणाम करीत अन्नधान्य व पिकांचे उत्पादन व उत्पन्न घटविण्यात ओझोनची भुमिका महत्वाची आहे. वातावरणातील या वरच्या थरात ओझोन हा २ ते ८ पीपीएम इतका असतो व त्यापेक्षा कमी झाल्याने ओझोनला छिद्र पडले असे म्हणतात. वातावरणात अस्थिरता निर्माण करण्यासाठी वातावरणातील जमिनीपासून १५ किलोमीटर ते ३५ किलोमीटर या उंचीवरील घटलेल्या ओझोनचा थर जबाबदार आहे.

- Advertisement -

चक्रीवादळ निर्माण करण्याचे सामर्थ्य ओझोन मध्ये आहे. यामुळेच ओझोन बाबत अधिक खोलवर संशोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जोहरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. डी. दरेकर उपस्थित होते. भूगोल विभाग प्रमुख डॉ एस डी पगार यांनी प्रास्ताविकात ओझोन दिनाची पार्श्वभुमी विशद केली. यावेळी व्यासपीठावर माजी भूगोल विभाग प्रमुख प्रा. पी.व्ही जाधव, बीओएस मेंबर डॉ राजेंद्र गुंजाळ, डॉ व्ही बी काळे, प्रा. एस. बी. हांडगे आदी उपस्थित होते.यावेळी के.टी.एच.एम. महाविद्यालयात अत्यंत अभिनव पद्धतीने चक्क ‘भूगोला’चे पूजन करण्यात आले. प्रकाशमान पृथ्वीचा गोल यावेळी लक्षवेधक ठरला.

जीवघेणा ’प्राणवायू’!

उपायात्मक माहिती देण्याबरोबरच प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले की, ‘ओझोन’ मधील इलेक्ट्रॉनचे बंध ही एक अद्भुत संरचना होय. खरंतर प्राणवायू किंवा ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र आले कि तयार होणारी इलेक्ट्रॉनिक संरचना म्हणजे ‘ओझोन’ होय. जमिनीलगतचा अतिरिक्त ओझोन हा मानवांबरोबरच पशूपक्षी आणि वनस्पती यांच्यात श्वासोच्छवास समस्या निर्माण करतो आहे हे वास्तव आहे. खोकला, घशात जळजळ, छातीत अस्वस्थता, डोळे चुरचुरणे, धाप लागणे यांसह अस्थमा, ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यामागे आपण रहात असलेल्या पर्यावरणात ओझोनरुपी जीवघेणा प्राणवायू तर नाही ना याबद्दल जागरूकता असणे गरजेचे आहे. याशिवाय आबालवृद्धांमध्ये फुफ्फुसांची वाढ व कार्यक्षमता कमी करण्यासाठी जमिनीलगतचा ओझोन कारणीभूत ठरतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की ह्रदयविकाराच्या प्रमाणांत व त्यामुळे होणार्‍या मृत्यूदरात फार मोठी वाढ झाली आहे. मात्र हृदय व रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड करीत हृदयविकाराचा झटका आणण्यासाठी देखील ओझोन कारणीभूत ठरतो असे त्यांनी सांगितले.

या उपायांचा गरज

- Advertisement -

आपण राहतो त्या परीसरात कोणकोणत्या दिवशी जमिनीलगतचा ओझोन स्तर जास्त वाढतो यांचे मोठे दर्शकफलक लावत घरात राहून आरोग्य काळजी घेणे. यासाठी सामुहिक महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत आदी विविध पातळ्यांवर प्रशासकीय प्रयत्न अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे यावेळी त्यांनी समाधान केले.

- Advertisment -