घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील तीनही जागांवर पुन्हा भाजपचेच उमेदवार

शहरातील तीनही जागांवर पुन्हा भाजपचेच उमेदवार

Subscribe

भाजपा राज्य प्रभारी सरोज पांडे यांची माहिती; भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात सोमवारी झाली बैठक

शिवसेना आणि भाजपची युती झाल्यास शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातही फेरबदल होतील अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी मात्र या तीन्ही जागांवर भाजपचेच उमेदवार असतील असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरातील भाजपच्या संघटन कार्याचा आढावा घेण्यासाठी सरोज पांडे नाशकात आल्या होत्या. यावेळी सोमवारी (ता. १५) सकाळी वसंत स्मृती कार्यालयात खासदार, आमदार आणि निमंत्रित मान्यवरांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शहरातील तीनही मतदार संघात भाजपचाच उमेदवार असेल असे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष आ.बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रवक्ते प्रा.सुहास फरांदे, आ.सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव,सदस्यता नोंदणी मोहिमेचे उत्तर महाराष्ट्र संयोजक शशिकांत वाणी, महानगर संयोजक पवन भगूरकर, संभाजी मोरुस्कर, प्रदीप पेशकार आदी होते. प्रारंभी आपल्या भाषणात आ.बाळासाहेब सानप यांनी बूथरचना आणि सदस्यता नोंदणी मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. उत्तम उगले यांनी आभार मानले.

- Advertisement -

विरोधीपक्ष कमकुवत; तुटून पडा

विरोधीपक्ष कमकुवत असल्याने त्याचा लाभ उचलून त्यांच्यावर वार करण्याची एकही संधी सोडू नका, त्यांच्यावर तुटून पडा आणि नाशकात भाजपच्या ताब्यात असलेल्या तिन्ही जागा आधीपेक्षा अधिक मत्ताधिक्क्याने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करा, असे आवाहन करीत सरोज पांडे यावेळी म्हणाल्या की, कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दैदीप्यमान यश मिळाले. भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. 70 वर्षे सातत्याने लढा दिल्यानंतर आपणास आज सुगीचे दिवस आले आहेत असे सांगतानाच महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर करावी, युवा संमेलने भरवावीत, पर्यावरण संवर्धनावर अधिक भर द्यावा असा सल्लाही सरोज पांडे यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी मंडलनिहाय बुथरचना आणि सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेऊन त्याबाबत मार्गदर्शनही केले.

शिवसेनेच्या गोटात चलबिचल

शहरातील तीन मतदारसंघांपैकी पश्चिम आणि मध्य नाशिक मतदारसंघात शिवसेना दावा करीत आहे. त्यादृष्टीने सेनेच्या इच्छुकांनी या मतदारसंघात तयारीही सुरु केली आहे. अशातच सरोज पांडे यांनी तिनही मतदारसंघ भाजपकडेच असतील असा दावा केल्याने शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -