घरक्राइमभरदिवसा 'एसबीआय' मधून १७ लाखांची धाडसी चोरी; प्रकार सीसीटीव्हीत कैद

भरदिवसा ‘एसबीआय’ मधून १७ लाखांची धाडसी चोरी; प्रकार सीसीटीव्हीत कैद

Subscribe

पंंचवटी : बनावट ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामात व्यस्त असल्याची संधी साधत एका कर्मचार्‍या टेबलवरील तब्बल १७ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादयक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पेठ फाटा येथील स्टेट बँकेत घडली असून, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्याचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅशिअर सकाळ सत्रात जमा झालेली कॅश मोजत असताना कर्मचार्‍यांचे नजर चुकवून काऊंटरच्या खिडकीतून हात टाकून चोरट्याने नोटांच्या बंडलमधील १७ लाख रुपये काही मिनिटांत चोरुन नेले. हिशेब लागत नसल्याने बँकेचे सीसीटीव्ही तपासले असता. त्यात एक चोरटा पैसे घेऊन पळून जाताना दिसून आला आहे. ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून ही चोरी केली आहे. विशेष म्हणजे, बँक व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे ही रोकड लंपास झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रबंधक युवराज चौधरी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पडोळकर तपास करीत आहेत.

- Advertisement -
नेमके काय घडले 

एसबीआय बँकेची पेठफाटा शाखेत बुधवारी (दि.२) रोजी शाखेचे कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी कॅश काऊंटरमधील जमा केलेली ५० ते ५५ लाख रुपयांची रोख रक्कम मोजून टेबलावर ठेवलेली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास बँकेत ग्राहक बनून आलेला संशयित चोर बँकेच्या परिसरात फिरत होता. त्याने बँकेतील कर्मचारी आपआपल्या कामात गुंग असल्याचे बाब हेरली. बोडके यांनी काढून ठेवलेल्या रोकडपैकी १७ लाख रुपयांची रोकड भामट्याने पिशवीत टाकून पळ काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -