घरदेश-विदेशपंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, आरोपीस अटक

पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, आरोपीस अटक

Subscribe

पंजाब अमृतसरमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली आहे. अमृतसरमधील गोपाळ मंदिर परिसरात दिवसाढवळ्या ही घटना घडली. गोळीबारात सुधीर सुरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अमृतसरमध्ये कचऱ्यात देवाची मूर्ती आढळल्याने ते गोपाळ मंदिर परिसरात आंदोलन करत होते. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीतून दोन मारेकरी पुढे आले आणि त्यांनी सुधीर सुरु यांच्यावर बंदूकीने गोळ्या झाडल्या. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संदीप सिंह असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सुधीर सुरी हे शिवसेना हिंदुस्तानचे प्रमुख राहिले आहेत. सुधीर सुरी यांच्यावर आज दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. काही काळापासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात याप्रकरणी काही गुंडांना अटकही केली होती. यावेळी चौकशीत आरोपींनी अनेक गोष्टींचाही खुलासा केला.

- Advertisement -

पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी गेल्या महिन्यात संयुक्त कारवाईत 4 गुंडांना अटक केली होती. अटक केलेले गुंड हे रिंडा आणि लिंडा गँगचे गुंड होते. यावेळी चौकशीत खळबळजनक खुलासे समोर आले, अटक करण्यात आलेले गुंड शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचा कट रचत होते. त्यासाठी त्यांनी रेकीही केली होती. मात्र गुन्हा घडण्यापूर्वी पोलीस आणि एसटीएफने चौघांना अटक केली. सुरी यांच्यावर दिवाळीपूर्वी हल्ला करण्याची कबुली आरोपींनी दिली होती.


हेही वाचा : हजारेंचं लोकपाल आंदोलन एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं; सुषमा अंधारेंचं टीकास्त्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -