घरक्राइमनाशिक जिल्ह्यात 31 बोगस डॉक्टरांविषयी तक्रारी

नाशिक जिल्ह्यात 31 बोगस डॉक्टरांविषयी तक्रारी

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील 31 बोगस डॉक्टरांविषयी जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खासगी रुग्णालयांत उपचार घेणे गोरगरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असून दुसरीकडे शासकीय रुग्णालयांत पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याचे दिसून येते.

डॉक्टरांची कमतरता, यंत्रसामुग्रीचा अभाव तसेच इतरही अनेक गोष्टींचा शासकीय रुग्णालयात अभाव असतो. परिणामी, गोरगरीब रुग्णांची मोठी परवडत होते. मग, रुग्ण बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी धाव घेतात. कारण, बोगस डॉक्टरांची फी कमी असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उपचार करत असलेला डॉक्टर बोगस आहे किंवा नाही, हे रुग्णांनाही ज्ञात नसते आणि आरोग्य विभागाकडून अशा डॉक्टरांच्या शिक्षणाबाबत चौकशी केली जात नसल्याने नाशिक जिल्हयात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागासह गोरगरिबांची वस्ती असलेल्या ठिकाणी बोगस डॉक्टर बस्तान बसवत असल्याचे यापूर्वी उघड झालेले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षी बोगस डॉक्टर नसताना डॉक्टर संदर्भात तक्रारी मागविल्या जातात.

- Advertisement -
तालुकानिहाय तक्रारी

2020-इगतपुरी (5), बागलाण (1), निफाड (2), येवला (1), नांदगाव (4), मालेगाव (1), नाशिक (1) एकूण ः15
2021- नांदगाव (4), नाशिक (1), मालेगाव (1), नाशिक महापालिका क्षेत्र (1) एकूण ः 7
2022 – इगतपुरी (7), मालेगाव (1) एकूण ः 8
2023-नांदगाव (1) एकूण ः1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -