घरक्राइमनायलॉन मांजा विक्री प्रकरणी तडीपरांचा आकडा २६ वर

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी तडीपरांचा आकडा २६ वर

Subscribe

नाशिक : घातक नायलॉन मांजा विक्री करणार्‍या आणि बाळगणार्‍या आणखी दोन मांजा विक्रेत्यांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नाशिक शहर पोलिसांनी आत्तापर्यंत २6 जणांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची उपनगर पोलिसांचीसुद्धा ही पहिलीच कारवाई आहे.

कन्हैय्यालाल किशनचंद वर्मा, त्र्यंबक सुनील म्हस्के अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. मकर संक्राती सणानिमित्त शहरात जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात पंतग उडविल्या जातात. पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. मांजा विक्रेत्यांवर शहर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तरीही नायलॉन मांजाचा साठा व विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरुन समोर आले आहे. परिमंडळ दोन मधील अजिंक्य प्रदिप भिसे (३४, रा. त्रिमुर्ती चौक, नवीन नाशिक), बाळासाहेब खंडेराव राहिंज (४१, रा. राम लक्ष्मण निवास, चरणदास मार्केट, संत ज्ञानेश्वर नगर, जेलरोड, नाशिकरोड), समाधान राजेंद्र मोरसकर (१९, हल्ली रा. गणेश चौक, नवीन नाशिक),हेमंत विरेंद्र गोला (१९ ,हल्ली रा. हेडगेवार नगर, नवीन नाशिक) यांच्यासह परिमंडळ एकमधील 10 विक्रेत्यांना शहरात वास्तव्य करण्यास मनाई केली आहे.

- Advertisement -

तर कन्हैय्यालाल किशनचंद वर्मा, त्र्यंबक सुनील म्हस्के यांच्यावर परिमंडळ दोन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी करवाई केली. आत्तापर्यंत एकूण २6 मांजा विक्रेत्यांना शहरातून तात्पुरते ७ ते १५ जानेवारी या कालावधीकरीता शहरात वास्तव्यास मनाई करण्यात आली आहे. घातक नायलॉन मांजाचा साठा व विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी परिमंडळ दोनमधून चौघे व परिमंडळ एकमधून १० असे एकूण 14 विक्रेत्यांना नाशिक शहर व जिल्ह्यातून २० दिवसांसाठी तडीपार केले आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (दि. 7) ते रविवारी (दि.15) या कालावधीकरीता संबंधित विक्रेत्यांवर केली.
मांजामुळे होणार्‍या गंभीर अपघातांची दखल घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी छापासत्र सुरु केले आहे. नायलॉन मांजाची कोणीही खरेदी करू नये. विक्री करणार्‍याची माहिती द्यावी, संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -