घरमहाराष्ट्रकाँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, ठाकरेंसोबतच युती करणार : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, ठाकरेंसोबतच युती करणार : प्रकाश आंबेडकर

Subscribe

माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. आमची सेनेसोबत जाण्याची भूमिका सेनेनी जाहीर करायची आहे. जाहीरपणे कधी सांगायचे सेनेनी ठरवावे. चार भिंतीत आमचे ठरले एकत्र जायचे

मुंबईः भाजपसोबत सध्या निवडणुका लढणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला आहे. भाजपसोबत गेलो असतो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खिमा केला असता, पण आम्ही तसे केले नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना मी चांगला ओळखतो, सेनेसोबत समझोता करण्यासाठी मी तयार आहे, एकत्र लढण्याबाबत ठाकरेंकडून जाहीर करणं बाकी आहे, असंही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील बलार्ड पिअर इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात आज पत्रकार परिषद घेतली आहे, त्यावेळी ते बोलत होते.

माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे. आमची सेनेसोबत जाण्याची भूमिका सेनेनं जाहीर करायची आहे. जाहीरपणे कधी सांगायचे हे सेनेने ठरवावे. चार भिंतीत एकत्र जायचे हे आमचे ठरले आहेत. सेना आमच्यासोबत येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय, काँग्रेस-एनसीपी आमच्या सोबत येणार नाही हे मला माहीत आहे. शिवसेनेनी आता आमची युती कधी होणार हे जाहीर करण्याबाबत ठरवले पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

- Advertisement -

भाजप आणि आरएसएसबरोबर वंचित बहुजन आघाडी कधीही जाणार नाही. त्यांच्यासोबत व्यवस्थेचं भांडण आहे. भाजपसोबत कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार हे स्पष्ट आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास आम्ही त्यांच्यासोबत युतीचा विचार करू, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. एकनाथ शिंदे हे खानदानी आहेत. एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक आहेत. ते 70च्या काळातील शिवसैनिक आहेत. पँथर आणि शिवसेना यांचं नातं त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पँथर आणि आनंद दिघेंचे संबंध नव्या पिढीला माहीत नाही. पँथर आणि आनंद दिघेंचे संबंध खूप चांगले होते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

तसेच पत्रकारांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी तुम्ही काल मध्यरात्री एकनाथ शिंदेंना भेटलात का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी गेली 15 दिवस उद्धव ठाकरेंना भेटलो नाही. महिन्याभरात मी महाराष्ट्रातच नाही. त्यामुळे भेटण्याचा प्रश्नच नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. तसेच कालची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेतची भेट ही इंदू मिलबाबत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री भेट; युती होणार का?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -