घरक्राइमबनावट वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी सखोल चौकशीची कोंग्रेसकडून मागणी

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी सखोल चौकशीची कोंग्रेसकडून मागणी

Subscribe

नाशिक : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांच्या मालमत्तेचेही चौकशीचीही मागणी काँग्रेसच्या अनुसूचित विभागाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा अंतर्गत बदलीसाठी चुकीच्या पद्धतीने कुठलेही निकष न तपासता केवळ पैश्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जातात हे पोलिसांना दिल्या गेलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन सिद्ध झाले आहे, त्याबाबत गुन्हाही दाखल झाला आहे. परंतु, जे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिले गेले ते कोणाच्या स्वाक्षरीने दिले गेले. त्या संबंधित अधिकार्‍यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. हे प्रकरण अंत्यत गंभीर आहे. त्यातून संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर माया जमवली असल्याची बोलले जात आहे. जिल्हा रुग्णालयात ऑपरेशनसाठी वापरण्यात येणारी उपकरणे ही निकृष्ट दर्जाची असल्याचेही समोर आले आहे. केवळ उपकरणेच नाही तर औषधे खरेदीत देखील कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.

वैद्यकीय बनावट प्रमाणपत्राद्वारे पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतले आहेत. हा प्रकार गंभीर असून, खाद्य पोलीस कर्मचारी हेराफेरी करीत असल्याचा प्रकार जिल्हा प्रशासन जिल्हा रुग्णालय यांच्या ऐवजी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत स्वतंत्रद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये वैद्यकीय बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आत्तापर्यंत लिफ्ट मॅन कांतीलाल गांगुर्डे व एका महिला पोलीस कर्मचार्‍याला अटक करण्यात आलेले असून, अद्याप मुख्य असलेल्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अधिकार्‍यांनी अटक पूर्ण जामीनासाठी धावाधाव सुरू केली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकार्‍या दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारु, अरुण दोंदे, विलास बागुल, संजय खैरनार, अ‍ॅड विकास पाथरे, अशोक शेंडगे, प्रा. प्रकाश खळे, अमोल मरसाळे, दिलावर मनिय्यार, सुंदर साळवे आदींच्या
स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisement -
अतिरिक्त शल्यचिकित्सकांवर कारवाईची टांगती तलवार

वैद्यकीय प्रमाणपत्र अपहार प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतलेले जिल्हा रुग्णालयाचे दोन अतिरिक्त शल्यचिकित्सक व लिपिकावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. जिल्हा रुग्णालयात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलिस दलाचा लिपिक, सिव्हिलचा लिफ्टमन, लिपिक, दोन तत्कालीन अतिरिक्त शल्यचिकित्सक आणि धुळे सिव्हिलच्या अतिरिक्त शल्यचिकित्सकांचे नाव निष्पन्न झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -