घरमहाराष्ट्रनाशिकफॉरेस्ट नर्सरीलगतच्या पूलाला भगदाड

फॉरेस्ट नर्सरीलगतच्या पूलाला भगदाड

Subscribe

महापूरानंतर गोदावरीवरील पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, महापालिकेची सोयीस्कर डोळेझाक

गंगापूररोडवरील फॉरेस्ट नर्सरीलगतच्या पूलाला मोठे भगदाड पडल्याची घटना गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेदरम्यान घडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेमुळे पूरपातळी कमी करण्यासाठी सूचविण्यात आलेल्या उपायोयजनांकडे दुर्लक्ष करणार्‍या महापालिकेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

गंगापूर रोड ते मखमलाबाद या मार्गावर महापालिका प्रशासनाने सुमारे १५ वर्षांपूर्वी हा पूल बांधला आहे. गोदावरीच्या पलिकडे उभ्या राहणार्‍या गृहप्रकल्पांसह कॅनल रोड, मळे वस्ती आणि मखमलाबाद गावाकडे जाणार्‍या नागरिकांची या पुलावरून नेहमीच मोठी वर्दळ असते. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुलाची जेथे सुरुवात होते, त्या ठिकाणी सुमारे १५ फूट व्यासाचे आणि १० फूट खोल एवढ्या आकाराचे भगदाड पडले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने हा पूल दोन्हीही बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
पूलाची पाहणी केल्यानंतर खचलेला भाग पूर्ववत करण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे पूलाच्या बांधकामाचा दर्जा, गोदावरीची पूरपातळी लक्षात न घेता केलेले काम आणि महापालिकेची भूमिका अशा सर्वच बाबींवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

- Advertisement -

उपाययोजनांकडे महापालिकेची डोळेझाक

गोदावरी नदीकाठच्या घरांना वारंवार महापूराचा तडाखा बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जल व विद्युत केंद्राच्या पथकाने गोदावरी नदीची पाहणी करत पूरप्रभाव कमी करण्यासाठी १७ उपाययोजना सूचविल्या होत्या. त्यात बापू पूल आणि फॉरेस्ट नर्सरी नजीकच्या पूल काढून टाकणे अथवा त्याची उंची वाढविण्याच्या सूचनेचाही समावेश होता. मात्र, महापालिकेने या उपाययोजनांकडेच डोळेझाक केली. परिणामी, हा पूल पूर्णपणे महापूरात बुडाला होता. हे दोन्ही पूल आणि पूररेषेतील बांधकामांमुळे पूराचे प्रभाव क्षेत्र वाढल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -