घरदेश-विदेशभाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली अत्यवस्थ; एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली अत्यवस्थ; एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समोर आले आहे. त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समोर आले आहे. त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आज, शुक्रवारी दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटली यांची भेट घेतली आहे. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि राज्यमंत्री अश्विनी चौबेदेखील रुग्णालयात उपस्थित होते. जेटलींवर ९ ऑगस्टपासून एम्सच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांचे एक पथक सतत जेटलींच्या सेवेत आहे. ९ ऑगस्टला एम्स रुग्णालयाने जेटलींच्या प्रकृतीची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर रुग्णालयाकडून कोणतेही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -