घरमहाराष्ट्रनाशिकदत्तू भोकनळची तुर्तास अटक टळली; उद्या जामिनावर सुनावणी

दत्तू भोकनळची तुर्तास अटक टळली; उद्या जामिनावर सुनावणी

Subscribe

नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेने दत्तू भोकनळ विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. विवाहाची तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित न राहिल्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार तरुणीने केली होती.

राष्ट्रीय रोइंगपटू दत्तू भोकनळ याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजुर केला आहे. त्यामुळे तुर्तास त्याची अटक टळली आहे. परंतु, त्याच्या जामीन अर्जावर अजून निर्णय बाकी असून २९ मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेने दत्तू भोकनळ विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती . विवाहाची तारीख दोनदा ठरवूनही तो विवाहाला उपस्थित न राहिल्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार तरुणीने केली. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

आशा दत्तू भोकनळ असे तक्रारदार महिलेचे नाव असून, त्या नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. आशा भोकनळ यांच्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर २०१७ ते ३ मार्च २०१९ या कालावधीत दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आडगाव येथील नाशिक पोलीस मुख्यालय आणि पुण्यातील रोइंग रोड येथे ते एकमेकांना भेटले. या दरम्यान दत्तू आणि आशा यांनी आळदीत विवाह केला. मात्र, या विवाहाची माहिती त्यांनी नातेवाईकांना दिली नाही. त्यामुळे सर्वांसमक्ष विवाह करण्यासाठी आशा यांनी तगादा सुरू केला. त्यामुळे ९ फेब्रुवारी २०१९ रोजी चांदवड येथे विवाह करण्यास दत्तू राजी झाला. त्यानुसार आशा यांच्या परिवाराने लग्नाची तयारी सुरू केली. १० हजार रुपये अग्रीम भरून मंगलकार्यालय निश्चित केले. मात्र, काहीतरी कारण सांगून दत्तू भोकनळ यांनी हा विवाह पुढे ढकलला. त्यामुळे पुन्हा २४ फेब्रुवारीस संगमनेर येथे विवाह करण्याचे ठरले. त्यावेळीही दत्तू विवाह सोहळयास उपस्थित राहिला नाही. दोघांच्या सहमतीने झालेल्या विवाहानंतर दत्तू भोकनळ यांनी मानसिक व शारिरीक त्रास दिल्याचे, आशा भोकनळ यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तू भोकनळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -