घरक्राइमदेवळा बँक अपहार प्रकरण : ग्राहकांना सव्याज पैसे मिळाले परत

देवळा बँक अपहार प्रकरण : ग्राहकांना सव्याज पैसे मिळाले परत

Subscribe

देवळा : येथील बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील फसवणूक झालेल्या पहिल्या टप्प्यातील ३९ खातेदारांच्या खात्यावर १ कोटी ९१ लाख ८२ हजारांची रक्कम बुधवारी (दि.१९) व्याजासह जमा करण्यात आले. त्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, आठवडाभरात आणखी १४ ग्राहकांच्या खाती पैसे वर्ग करण्यात येणार असून, फसवणूक झालेल्या उर्वरित २०३ ग्राहकांनादेखील कसा न्याय देता येईल, यासाठी दिवाळीनंतर बँक अधिकारी व फसवणूक झालेल्या ग्राहकांची बैठक घेणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भऊर येथे उपस्थित अपहार प्रकरणातील फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या बैठकीत आमदार डॉ. आहेर बोलत होते.

- Advertisement -

बँक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणाचा तपास टप्याटप्याने सुरू असून, त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तोंडावर दिवाळी तसेच पुढील रब्बी हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आमदार डॉ. आहेर यांनी बँकेचे वरीष्ठ अधिकारी यांच्या वारंवार भेटी घेतल्या. किमान बँकेच्या नजरेत ज्यांच्याकडे सबळ पुरावे आहेत त्या पहिल्या टप्यातील फसवणूक झालेल्या खातेदारांना दिवाळीपूर्वी त्यांचे हक्काचे पैसे मिळावे यासाठी आमदार आहेर यांनी पाठपुरावा केला होता.

यावेळी बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर, भऊर येथील माजी सुभेदार कारभारी पवार, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष अभिमन पवार आदी बँक अपहार प्रकरणातील ग्राहक उपस्थित होते. दिवाळीच्या तोंडावर पैसे हाती आल्याने ग्राहकांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.

- Advertisement -
पदनाम लावण्याची सूचना

बँकेत कार्यरत कोण अधिकारी किंवा कोण कर्मचारी याची माहिती नसल्याने ग्राहकांना कोणत्या कामासाठी कुणाशी संपर्क साधावा हे कळत नाही. गैरव्यवहाराला हेदेखील एक कारण असल्याचे बाबा पवार यांनी डॉ. आहेर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर अधिकार्‍यांचे पदनाम व फोटो तातडीने लावण्याची सूचना आ. डॉ. आहेर यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -