घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडिजेचा दणदणाट, आवाज मर्यादेच उल्लंघन; सहा मंडळे अन् डिजे चालकांवर गुन्हे दाखल

डिजेचा दणदणाट, आवाज मर्यादेच उल्लंघन; सहा मंडळे अन् डिजे चालकांवर गुन्हे दाखल

Subscribe

नाशिक : गणेशोत्सवात डीजे वाजणार यासाठी गणेशोत्सव महामंडळ व सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे परवानगीसाठी हट्ट धरला होता. मंडळांचा हट्ट बघून भुसे यांनी नियम अटी घालून दिल्यानंतर वाद्य वाजवण्याची परवानगी मंडळांना देण्याचे आदेश दिले. परंतु, विसर्जन मिरवणूक संपतात काही तासातच आवाजाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत 23 पैकी सहा मंडळाच्या अध्यक्ष व डीजे चालक मालकांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतांना नियमांचे पालन करणेबाबत व अटी शर्तीचा भंग केला जाणार नाही याबाबत लेखी हमीपत्र दिलेले होते. असे असूनही भद्रकाली ते पंचवटी या मार्गावरील एकुण ६ गणेश मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याच समोर आल्याने त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषण करणे तसेच पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात 5 आणि नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत 1 मंडळांचे अध्यक्ष तसेच डिजे चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनिवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी उच्चक्षमेतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती. ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोर तरुणाई बेधुंद नाचताना दिसून आली.
मेनवरील मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळाने उच्चक्षमेतेचे ध्वनिवर्धकांचा वापर केला होता. ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणार्‍या भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. ध्वनिवर्धक तसेच ढोल ताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले. विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यांच्यावर गुन्हा दाखल 

  • रोकडोबा मित्र मंडळ : अध्यक्ष अतुल मदन जाधव व डी. जे. वादक वैभव गायकवाड
  • शिवसेवा मित्र मंडळ, गाडगे महाराज पुतळा : अध्यक्ष संदीप कानडे व डीजे चालक चैतन्य गिरीष काळे
  • युवक मित्र मंडळ, मुंबईनाका : अध्यक्ष किरण मोटकरी व डीजे चालक राहुल कुणाल जाधव
  • दंडे हनुमान मित्र मंडळ, काजीपूरा : अध्यक्ष मंथन मोटकरी व डीजे चालक ऋषीकेश विजय इंगळे
  • युनायटेड फ्रेंड सर्कल, मुंबई नाका : अध्यक्ष मयुर वझरे व डीजे चालक सम्राट बंडुपंत आमले
  • साईराज फाउंडेशन मित्र मंडळ, जेलरोड : अध्यक्ष निखील दिपक सपकाळे व डीजे चालक गणेश वसंत शिरसाठ

या अंतर्गत गुन्हा दाखल 

ध्वनी मर्यादेच उल्लंघन तसेच पोलीसांच्या मनाई आदेश व अटी शर्तीचा भंग केल्याबद्दल भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत 5 आणि नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील एका मंडळावर कारवाई करण्यात आली आहे. या मंडळांवर आणि डिजे चालकांवर पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ व १९ तसेच ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण २००० चे नियमांचा भंग तसेच भा.द.वि. कलम १८८, २९१, १०९, ११४, ३४ सह मपोका. कलम १३५ सह ३३ (r) (३)/१३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -