घरमहाराष्ट्रनाशिकजग बदल घालुनी घाव, सांगून गेले भीमराव; शहरात उत्साहात जयंती साजरी

जग बदल घालुनी घाव, सांगून गेले भीमराव; शहरात उत्साहात जयंती साजरी

Subscribe

शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम, उपक्रम, मिरवणुकांची रेलचेल

नाशिक : मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी,सकाळी सामूहिक बुद्धवंदना, व्याख्यान, प्रतिमा
पूजन आणि सांयकाळी भव्य मिरवणूक…

कोरोनानंतरच्या अशा अभूतपूर्व वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिकरोडसह जुने नाशिकमधील मोठा राजवाडा येथूनही भव्य मिरवणूक निघाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. शहरातील मुख्य मिरवणूक म्हणून मोठा राजवाडा येथील काळे चौकात गुरुवारी (दि.१४) सायंकाळी सहा वाजता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांनी मिरवणुकीचा नारळ वाढवला. त्यांच्या हस्ते मोठा राजवाडा समाजभूषण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार अशोक पंजाबी व संदीप डोळस यांना प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आनंद सोनवणे, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, माजी उपमहापौर प्रथमेश गिते, संजय खैरनार, गणेश बर्वे, गोविंद कांकरिया, मनोज जाधव, हरिष नुनसे आदी उपस्थित होते.

नीळा फेटा परिधान करत सर्वांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. विविध संकल्पनांवर आधारलेले चित्ररथ, ‘जय भीम’चा उल्लेख असणारे टी शर्ट, रिबिन्स व टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. विशेष म्हणजे, कोरोनानंतरची ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना अबाल वृध्दांसह महिलांनी मोठ्या संख्येने हात सहभाग नोंदवला.

- Advertisement -

‘जग बदल घालुनी घाव। सांगून गेले मला भीमराव’, ‘सोनियाची उगवली सकाळ’, ‘आहे कुणाचं योगदान’, ‘या लाल दिव्याच्या गाडीला’ अशी अनेक बहारदार भीमगिते उत्साह वाढवत होती. या गाण्यांवर समाजबांधवांनी एकच ठेका धरल्याचे चित्र मिरवणुकीत बघायला मिळाले. जागोजागी कमानी, स्वागतफलक, विद्युत रोषणाई, पताका आणि झेंडे लावण्यात आल्याने व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावलेले होते

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -