घरमहाराष्ट्रनाशिक‘मविप्र’त शिक्षणाधिकाऱ्यांची खांदेपालट

‘मविप्र’त शिक्षणाधिकाऱ्यांची खांदेपालट

Subscribe

सी.डी.शिंदे, डॉ.अजित मोरे कायम; चांदवड तालुक्यातील तिघांचा समावेश

नाशिक : शैक्षणिक क्षेत्रात 108 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत सत्तांतर घडल्यानंतर आता प्रशासकीय खांदेपालट सुरू झाली आहे. संस्थेत सात शिक्षणाधिकार्‍यांसह एक प्रशासन विभागप्रमुख व प्रिंटिंग प्रेस विभागासाठी स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. शिक्षणाधिकार्‍यांच्या नियुक्तीनंतर संस्थेतील कर्मचार्‍यांमध्ये याविषयी उलटसुलट चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे व डॉ.अजित मोरे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षणाधिकार्‍यांची नियुक्ती करताना चांदवड तालुक्यातील तिघांचा समावेश झाल्याने विरोधी गटाच्या समर्थकांनी सत्ताधार्‍यांवर शरसंधान साधले आहे. सत्तांतरानंतर नियुक्ती करताना सी. डी. शिंदे यांना पदावर कायम का ठेवले असेल, याविषयी कर्मचार्‍यांच्या मनात आता कुतूहल निर्माण झाले आहे. तर, आर. डी. दरेकर यांच्या नियुक्तीविषयी सत्ताधारी गटातील काही संचालकांनाच अनाकलनीय असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्याच निर्णयाविषयी सत्ताधारी गटातील काही संचालकांतही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

शिक्षणाधिकारी खालीलप्रमाणे 

प्रा. डॉ.भास्कर ठोके
विभाग : माध्यमिक
शिक्षण : एम. ए. मराठी, पीएच.डी.
मूळ गाव : चांदवड तालुक्यातील मात्र, लासलगाव येथे स्थायिक

प्रा.डॉ.नितीन जाधव
विभाग : कनिष्ठ व वरिष्ठ महा.
शिक्षण : एम. ए. (पीएच. डी.)
मूळ गाव : जोपूळ (ता.चांदवड)

- Advertisement -

प्रा.सी.डी.शिंदे
विभाग : प्राथमिक शिक्षण
शिक्षण : बी.ए., डी.एड.
मूळ गाव : सटाणा

डॉ. आर. डी. दरेकर
विभाग : मेडिकल विभाग
शिक्षण : कॉमर्स, पीएच. डी.
मूळगाव : पिंपळगाव बसवंत

डॉ. डी. डी. लोखंडे
विभाग : अभियांत्रिकी
शिक्षण : एम. एसस्सी. नेट
मूळ गाव : चांदवड

प्रा. डॉ.विलास देशमुख
विभाग : आयएमआरटी महा.
शिक्षण : एमएसडब्ल्यू, पीएच.डी.
मूळ गाव : मोहाडी (ता.दिंडोरी)

संजय पाटील
विभाग : होरायझन इंग्लिश मीडि.
नोकरी : इंग्रजीचे प्राध्यापक
मूळ गाव : धूळगाव (ता.येवला)

डॉ.अजित मोरे
विभाग : जनरल प्रशासन विभाग
शिक्षण : कॉमर्स पदवी, पीएच. डी.
मूळ गाव : पिंपळगाव बसवंत

डॉ.अशोक पिंगळे
विभाग : प्रिंटिंग प्रेस
शिक्षण : एम. फार्म., पीएच.डी.
मूळ गाव : मखमलाबाद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -