घरमहाराष्ट्रनाशिकडोक्याला पिस्तूल लावून मागितली खंडणी

डोक्याला पिस्तूल लावून मागितली खंडणी

Subscribe

नाशिक कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील प्रकार

दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत टॉमेटो खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या एका टॉमेटो व्यापाऱ्याला तिघा संशयितांन डोक्याला पिस्तूल लावून सायंकाळपर्यंत ५० हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे. यावेळी संशयितांनी व्यापाऱ्याच्या डोक्यात दगड घालण्याचा देखील प्रयत्न केला.

याबाबत अधिक वृत्त असे कि, दिंडोरी रोडवरील कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सकाळी टॉमेटो व्यापारी त्याच्या गाळ्यात असताना ऍक्टिव्हा दुचाकीवरून तिघे भामटे आले त्यांनी व्यापाऱ्याच्या गाळ्यात जाऊन एकाने त्याला शिवीगाळ करीत हातातील पिस्तूल डोक्याला लावले तर अन्य एकाने हातात दगड घेत डोक्यात मारण्याचा प्रयत्न करून “संध्याकाळपर्यंत ५० हजार रुपये खंडणी दे नाहीतर जीवंत ठार मारू अशी धमकी दिली” अशी धमकी दिली.
सदर प्रकरणानंतर त्या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान,अशा प्रकारे व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याने तसेच दोन ते तीन शेतकऱ्यांना मारहाण केल्यामुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी शेतमाल वाहनात न भरताच बाजार समितीतून काढता पाय घेतला.

- Advertisement -

बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून गुंडाराज वाढला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके व खून प्रकरणातील संशयित व आरोपींचे हस्तक व्यापारी, आडत्यांना धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे.सकाळच्या सुमाराला घडलेल्या घटनेमुळे शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो व्यापारी, आडत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सर्व संचालक मंडळाने पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकाराबाबत तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे.

संचालक मंडळाच्या पुढाकाराने गुन्हा दाखल

बाजार समितीत गुन्हेगारीकडून लूट,खंडणी ही बाब नवीन नाही. परंतु एका व्यापाऱ्यांस बंदूक लागून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मगितल्याची घटना घडली.या घटनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने दखल घेत पंचवटी पोलीस ठाणे गाठले,तसेच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची भेट घेत गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -