घरक्राइमकैलास शहाच्या साथीदारावर हरियाणात गुन्हा

कैलास शहाच्या साथीदारावर हरियाणात गुन्हा

Subscribe

रोलेटच्या माध्यमातून दोन कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक

नाशिक  पोलीस तपासात रोलेटकिंग कैलास शहा व त्याच्या साथीदारांचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत. रोलेटच्या माध्यमातून दोन कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुग्राम, हरियाणा येथील धन्ना गुलाब सिंह यांनी गुरुग्राम सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हरियाणा पोलिसांनी कैलास शहाचे साथीदार रमेश चौरसिया, राजू मलिक, व्यवस्थापक गुड्डू आणि सतप्रकाश सिंगलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश चौरासियाने धन्ना सिंहसोबत गेम किंग इंडिया लि.च्या नावाने करार केला होता. चौरासियाने सिंह यांना ऑनलाईन रोलेट खेळवण्यासाठी काही आयडी देत काम करण्यास सांगितले. दोघांनी गेम किंग इंडिया लि., गेम किंग इंडिया नेट आणि फनरेप नेट, प्लेरेप डॉट कॉम नावाने कंपनी सुरु केली. त्या आयडीव्दारे रोलेट खेळवला जात आहे. चौरासियाने धन्ना सिंह यांना पंजाब बँकेतील ड्रीम वर्ल्ड नावाने उघडून दिले. या खात्यावर सिंह यांनी ६० लाख रुपये जमा केले. तर काही रक्कम व्यवस्थापक गुडू याला दिली. त्यानंतर दुसर्‍या खात्यावर ५५ लाख रुपये जमा केले. तसेच, इतर खात्यांवर २६ लाख रुपये जमा केले. गुड्डूच्या सांगण्यावरुन सिंह यांनी रोलेटचे राजू मलिकला ७० लाख रुपये दिले. त्यानंतर मलिकने सतप्रकाश सिंगलासोबत काम करण्यास सांगितले. त्यानुसार सिंगलाने त्यांना आयडी आणि नवीन बँक खाते क्रमांक दिला. त्यावर त्यांनी १३ लाख रुपये जमा केले. प्रत्यक्षात काहीच रक्कम मिळाली नाही, त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -